Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rubab Movie: नवं कोरं मराठी गाणं प्रदर्शित! मन जुळले’ प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपट ‘रुबाब’मधील नवे रोमँटिक गाणे ‘मन जुळले’ प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, त्यातून चित्रपटाची हळवी आणि प्रेमळ बाजू समोर आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 24, 2026 | 01:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या ‘रुबाब’ चित्रपटातील नवे रोमँटिक गाणे ‘मन जुळले’ प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, या गाण्याने चित्रपटातील प्रेमळ आणि हळवी बाजू उलगडून दाखवली आहे. संघर्ष, आत्मसन्मान आणि ध्येयाचा प्रवास मांडणाऱ्या ‘रुबाब’मध्ये प्रेमाचा कोमल स्पर्श किती महत्त्वाचा आहे, हे ‘मन जुळले’ या गाण्यातून प्रभावीपणे अधोरेखित होते. या गाण्यात अभिनेता संभाजी ससाणे आणि अभिनेत्री शितल पाटील यांच्या प्रेमप्रवासाची सुंदर झलक पाहायला मिळते. एकमेकांकडे ओढ घेणारी नजर, न बोलता समजून घेणारे क्षण, हळूच उमलणाऱ्या भावना आणि मन जुळल्यानंतर निर्माण होणारी भावनिक जवळीक या सगळ्याच गोष्टी गाण्यात अतिशय नाजूकपणे साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘मन जुळले’ हे केवळ एक रोमँटिक गाणे न राहता, प्रेमात असलेल्या प्रत्येक मनाची भावना व्यक्त करणारे गाणे ठरते.

‘बेशरम रंग’ गाणं तीन वर्षांनंतरही तितकंच लोकप्रिय! ऊर्जावान संगीतामुळे हे गाणं पार्टी अँथम

केतकी माटेगावकर यांच्या सुमधुर आणि भावस्पर्शी आवाजाने हे गाणे अधिकच खास झाले आहे. त्यांच्या गायकीतील कोमलता आणि हळवेपणामुळे गाणे ऐकतानाच मनात अलगद घर करते. चिनार-महेश यांच्या मधुर आणि हृदयाला भिडणाऱ्या संगीतामुळे गाण्याला सुंदर लय लाभली असून, समीर आशा पाटील यांच्या अर्थपूर्ण शब्दांनी प्रेमाची गहिरी अनुभूती उलगडून दाखवली आहे. संगीत, शब्द आणि आवाज यांचा हा सुंदर संगम ‘मन जुळले’ला एक भावनिक उंची देतो.

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “‘रुबाब’ हा चित्रपट आत्मसन्मान, संघर्ष आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रवासावर आधारित आहे. मात्र, प्रत्येक ताकदवान व्यक्तीमागे एक प्रेमळ आणि संवेदनशील हृदय असते. संभाजी आणि शितल यांच्या नात्यातील नितळ, शुद्ध प्रेम ‘मन जुळले’ या गाण्यातून प्रेक्षकांसमोर येते. या गाण्यात भावना, विश्वास आणि मन जुळल्यानंतरची शांत, सुखद अनुभूती स्पष्टपणे जाणवते. प्रेमाची खरी भावना अनुभवण्यासाठी हे गाणे नक्कीच मदत करेल.”

Palash Muchhal चे काळे कारस्थान उघड? बेडवर दुसऱ्या मुलीसोबत रंगेहात पकडल्याचा अभिनेता-निर्मात्याच्या धक्कादायक आरोप

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते संजय झणकर आणि गौरी झणकर असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. प्रेम, संघर्ष आणि आत्मसन्मानाची गोष्ट मांडणारा ‘रुबाब’ चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ‘मन जुळले’ या गाण्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

Web Title: Rubab movie a brand new marathi song released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 01:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.