अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला (फोटो सौजन्य - Instagram)
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानबद्दल एक मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे. त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. जखमी अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रात्री उशिरा २ च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, एका अज्ञात व्यक्तीने रात्री सैफ-करीनाच्या घरात प्रवेश केला आणि अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला.
पोलिसांनी दिला जबाब
पोलिसांनी सांगितले की, “काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसला आणि त्याच्या मोलकरणीशी वाद घालू लागला. जेव्हा अभिनेत्याने मध्यस्थी करून त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.” ANI ने या बातमीची पुष्टी केली असून सैफच्या तब्बेतीबाबत अजूनही काही अपडेट आलेली नाही. मुंबई पोलीस या संदर्भात पुढील शोध घेत असून याबाबत लवकरच अपडेट देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
सैफ अलीवर जीवघेणा हल्ला
An unknown person entered Actor Saif Ali Khan’s residence and argued with his maid, late last night. When the actor tried to intervene and pacify the man, he attacked Saif Ali Khan and injured him. Police are investigating the matter: Mumbai Police
(file photo) pic.twitter.com/pHgByuxqB9
— ANI (@ANI) January 16, 2025
डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट
बांद्रा येथील घरी सैफ अली खानवर साधारण पहाटे 3.30 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चाकूने वार केला असून लिलावती रूग्णालयात त्याच्यावर त्वरीत उपचार सुरू करण्यात आले. लिलावती रूग्णालयाचे COO डॉक्टर निरज उत्तमानी यांनी सैफच्या आरोग्याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. ‘सैफवर चाकूने 6 वार करण्यात आले असून यापैकी 2 वार हे अत्यंत खोलवर करण्यात आले आहेत. एक वार हा मणक्याजवळ झाला असून भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन यांच्या टीमद्वारे सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे’ असे यावेळी डॉक्टरांनी नमूद केले आहे.
फॉरेन्सिक टीम निवासस्थानी
सैफ आणि करिनाच्या घरी रात्री नेमके काय घडले याचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी आता फॉरेन्सिक टीम निवासस्थानी दाखल झाले आहेत. पहाटे सैफला रूग्णालयात दाखल केल्यानंतरच पोलिसांनीही त्वरीत कारवाईला सुरूवात केली असून सैफच्या निवासस्थानी पुढील तपास करण्यासाठी आता वेगाने फॉरेन्सिक टीम कामाला लागली आहे. लवकरच सैफला याबाबत न्याय मिळेल असे सांगण्यात येत असून सध्या सैफची तब्बेत स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
कुटुंबाकडून आले स्पष्टीकरण
सैफ अली खानच्या कुटुंबीयांकडून विनंती
दरम्यान सैफ अली खानच्या कुटुंबीयांकडून या परिस्थितीबाबत मीडिया आणि चाहत्यांना शांत राहून सध्याच्या परिस्थितीत साथ देण्याची विनंती करण्यात आली आहे. तसंच सध्या सैफवर शस्त्रक्रिया चालू असण्याचेही या स्टेटमेंटद्वारे सांगण्यात आले आहे. याबाबत माहिती पुढे देण्यात येईल असेही यात नमूद करण्यात आले आहे