sajiri and shaunak wedding mulgi jhali ho
मागील बऱ्याच दिवसांपासून सर्वांना ‘मुलगी झाली हो’(Mulgi Zali Ho) मालिकेतील साजिरी आणि शौनकच्या लग्नाची उत्सुकता होती. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अखेर साजिरी आणि शौनक(Sajiri And Shaunak Wedding) विवाहबंधनात अडकणार आहेत. साजिरी आणि शौनकला आशीर्वाद देण्यासाठी ‘स्वाभिमान’ (Swabhiman), ‘सहकुटुंब सहपरिवार’(Sahkutumb Sahpariwar), ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte), ‘फुलाला सुगंध मातीचा’(Phulala Sugandh Maticha) आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेतले कलाकार खास हजेरी लावणार आहे. यासोबतच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चे(Mi Honar Superstar Chote Ustad) जज सचिन पिळगांवकर आणि सूत्रसंचालक सिद्धार्थ चांदेकर आणि अवनी जोशी यांची देखील या लग्नसोहळ्याला खास उपस्थिती असणार आहे.
[read_also content=”तापसी पन्नूने केली कमाल, ‘ब्लर’ चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या अभ्यासासाठी तब्बल १२ तास डोळ्यांवर बांधली पट्टी https://www.navarashtra.com/entertainment/taapsee-pannu-stayed-blind-folded-on-the-sets-of-blur-movie-nrsr-203696/”]
मालिकेतल्या या लग्नसोहळ्यासाठी साजिरी म्हणजेच दिव्या पुगांवकर खूपच उत्सुक आहे. लहानपणापासून ज्याचं स्वप्न पाहिलं त्या शौनकशी विवाह होत असल्यामुळं तिचं स्वप्न पूर्ण होत आहे. या विवाहसोहळ्यासाठी साजिरीचा खास लूक डिझाईन करण्यात आला आहे. मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नातला लूक बऱ्याच लूक टेस्ट घेतल्यानंतर फायनल करण्यात आला आहे. नववधूच्या रुपात स्वत:ला पाहिल्यानंतर माझं खरंच लग्न होतंय की काय असं वाटत होतं. त्यामुळं मुलगी झाली हो मालिकेची संपूर्ण टीम या खास विवाह सोहळ्यासाठी उत्सुक आहे.