फोटो सौजन्य - Social Media
मुंबईच्या आझाद मैदान येथे शपथ विधीचा समारोह सुरु होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राह्यच्या कारोभार हाती घेताच राज्यचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. लोकशाहीच्या या समारोहामध्ये अनेक दिग्गज जण जमले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा समारोह पार पडला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून या क्षणाची वाट पाहिली जात होती. अखेर त्या क्षणांना राज्याने अनुभवले. राज्यचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा हाती घेतली आहे.
दरम्यान, शपथ विधीमध्ये बॉलिवूड अवतरला होता. तसेच इतर क्षेत्रातील काही दिग्ग्जना या समारोहासाठी बोलावले गेले होते. दरम्यान, देशाचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान या शपथविधीमध्ये काही हटक्या अंदाजात दिसून आला. त्याचबरोबर बॉलिवूडचा किंग खान म्हणून जगभरात ख्याती असलेला शाह रुख खान त्याच्या आकर्षक लूकमध्ये दिसून आला. रणवीर सिंह, संजय दत्त, रणबीर कपूर तसेच इतर सुप्रसिद्ध अभिनेते मंडळी या शपथ विधीमध्ये दिसून आले होते. आझाद मैदान स्टाईलने भरलेला होता. त्याचबरोबर उद्योगपती मुकेश अंबानी त्यांच्या सह कुटुंबासह या समारोहाला उपस्थित राहिले होते.
माधुरी दीक्षित, विकी कौशल, खुशी कपूर, रूपा गांगुली, सिद्धार्थ रॉय अशी कलाकार मंडळींनी लोकशाहीच्या या समारोहात उपस्थिती लावली. इतकेच नव्हे तर चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, बोनी कपूर आणि एकता कपूर यांच्यासह श्रद्धा कपूर, जय कोटेक, विक्रांत मॅसी आणि जयेश शाह यांनी देखील शपथ विधीला हजेरी लावली. आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्याला 42,000 लोक उपस्थित होते. या सोहळ्याला भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांसह बिरेंद्र सराफ आणि अनिल काकोडकर यांनी उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, जेपी नड्डा यांसारख्या 10 केंद्रीय मंत्र्यांसह 19 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या सोहळ्यात सहभागी झाले. व्हीआयपी पाहुण्यांसाठी 2,000 खास बसण्याची सोय केली होती, तर 40,000 लोकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सोहळ्याच्या सुरक्षेसाठी 3,500 पोलिस आणि 520 अधिकाऱ्यांसह 4,000 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते.
आकर्षक लूकमध्ये दिसून आला सलमान
अभिनेता सलमान खान या शपथ विधीमध्ये डॅशिंग अवतारात दिसून आला आहे. सूट बूट घालून, जेंटलमेन असा पेहराव करून सलमानने समारोहाचे शोभा वाढवली आहे. मुळात, सलमान त्याच्या हटके लूकमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.