(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी बुधवारी म्हणजेच 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये सात फेऱ्या घेतल्या. आता दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रिपोर्टनुसार कीर्ती सुरेश डिसेंबर महिन्यात तिचा बॉयफ्रेंड अँटोनी थाटीलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. नुकतीच अभिनेत्रीच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. कीर्ती सुरेशच्या लग्नाचे रजनीकांतसोबत मोठे नाते आहे. ते कनेक्शन काय आहे जे जाणून घेऊयात.
जसजशी लग्नाची तारीख जवळ येत आहे, तसतशी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढू लागली आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियाव व्हायरल होत आहे. लग्नपत्रिकेनुसार कीर्ती सुरेशचे १२ डिसेंबर रोजी लग्न होणार आहे. लग्नपत्रिकेवर कीर्ती सुरेशचे आई-वडील सुरेश कुमार आणि मनेका सुरेश यांच्या स्वाक्षरी दिसत आहेत. कीर्ती सुरेश 12 डिसेंबरला लग्न करणार हे स्पष्ट झाले आहे. 12 डिसेंबर हा सुपरस्टार रजनीकांत यांचाही वाढदिवस आहे. त्यामुळे दोघांचे मोठे नाते आहे. यामुळे रजनीकांत आनंद व्यक्त करत आहेत. कीर्ती सुरेश आणि रजनीकांत 2021 मध्ये ‘अन्नतथे’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला.
हे जोडपे 15 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे
अभिनेत्री आता लवकरच रितीरिवाजानुसार लग्न बंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री गोव्यात लग्न करणार आहे. या लग्नाला फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीच हजेरी लावणार आहेत. कीर्ती सुरेश यांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजानुसार होणार आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या लग्नाचे विधी 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 11 डिसेंबर रोजी सकाळी संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्ती आणि अँटनी 15 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही शाळेत असताना एकमेकांना भेटले होते.
‘पुष्पा 2’ च्या रिलीज दरम्यान अल्लू अर्जुन का झाला भावूक? मुलगा अयानशी संबंधित हे प्रकरण!
कीर्ती सुरेशचे येणारे आगामी चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कीर्ती सुरेश लवकरच ‘बेबी जॉन’मध्ये दिसणार आहे. हा तामिळ चित्रपट ‘थेरी’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कॅलिस यांनी केले आहे. या चित्रपटात वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 25 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.