"सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर हत्याच..." सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा
अभिनेता सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) सध्या तिच्या खुलासांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती सलमान खानसोबतच्या खुलासांमुळे चर्चेत आली होती. आता अशातच तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तिने सलमानवर खुलासा न करता दिवंगत बॉलिवूड सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या झाली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा सोमी अलीने केला आहे.
हे देखील वाचा – रुह बाबा आणि मंजुलिका यांच्यातील लढत कोणत्या ओटीटीवर दिसणार ?
सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने ‘रेडिट’ या सोशल मीडिया ॲपवर ‘आस्क मी एनिथिंग’सेशन ठेवलं होतं. या सेशनमध्ये सोमीला इंडस्ट्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्या सेशन दरम्यान सोमीला ‘सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत तुमचे मत काय आहे? बॉलिवूडने ज्या पद्धतीने त्याला वागणूक दिली ती खरोखरच निराशाजनक आहे.’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने उत्तर देताना, सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा तिने दावा केला. तिने दिलेल्या उत्तरामुळे अवघी इंडस्ट्री हादरून गेली आहे. तिच्या कमेंटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
“सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर हत्या…” सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा
सोमी अलीने उत्तर दिले की, “त्याची हत्याच करण्यात आली आहे. मात्र त्या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आलेले आहे. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांना विचारा, ज्यांनी त्याचे शवविच्छेदन अहवाल बदलले. सुशांतचे शवविच्छेदन अहवाल का बदलले? त्यांना विचारा.” अभिनेता सुशांत सिंग राजपूतने जून २०२० मध्ये त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. अभिनेत्याच्या निधनाच्या चार महिन्यानंतर एम्स मेडिकल बोर्डने सुशांतची हत्या नसून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर गुप्ताने सुशांतच्या शरीरावर फाशीशिवाय इतर कोणत्याही खुणा नसल्याचं सांगितलं होतं.