२००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘भूल भुलैया’ चित्रपटाचा ‘भूल भुलैया ३’ चित्रपट हा तिसरा भाग आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. २०२२ मध्ये आलेल्या सीक्वेलमध्ये अक्षयची जागा कार्तिक आर्यनने घेतली. अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया ३’ मध्ये कार्तिकने रूह बाबा बनून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. दुसऱ्या भागाच्या घवघवीत यशानंतर तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. आता लवकरच चौथ्या भागाचीही घोषणा करण्यात येणार अशी चर्चा सुरू आहे. अद्याप याची अधिकृत माहिती मिळाली नसून ही चर्चा आहे.