'तेरे नाम' मधली गाजलेली हेअरस्टाईल कोणापासून प्रेरित होती? सलमान खानने २२ वर्षांनी केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला आजच्या घडीला विशेष ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या विशेष स्टाईलच्या माध्यमातूनच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सलमान खान तीन दशकांहून अधिक काळापासून रुपेरी पडद्याच्या माध्यमातून तो चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. त्याच्या चित्रपटांची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. आता अशातच सध्या सलमान खान त्याच्या एका जुन्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या त्या जुन्या चित्रपटातील हेअर स्टाईलचे आणि त्याच्या लूकचे लाखो चाहते आजही आहेत. दिग्दर्शकांनी त्याचा लूक कोणाला प्रेरित होऊन केला होता, याचं उत्तर स्वतः अभिनेत्याने दिलं आहे.
अखेर पुन्हा परतला ‘श्रीकांत तिवारी’, मनोज बाजपेयीच्या ‘The Family Man 3’ पोस्टरने वेधले लक्ष
२००३ साली रिलीज झालेल्या ‘तेरेनाम’ चित्रपटात सलमान खानने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या लूकचे लाखो चाहते होते आणि आजही आहेत. सलमानने या चित्रपटामध्ये कोणाला प्रेरित होऊन हेअरस्टाईल केली आहे. या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने कपिल शर्मा शोमध्ये दिलं आहे. सध्या कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ कमालीचा चर्चेत आहे. सध्या तिसरा सीझन सुरु आहे. एका संभाषणा दरम्यान, सलमान खानने कपिलला सांगितले की, “माझा ‘तेरेनाम’ चित्रपटातील लूक एका महान व्यक्तीपासून प्रेरित आहे. माझा हा लूक त्याकाळात तरुणांमध्ये कमालीचा लोकप्रिय झाला होता. माझी ही हेअरस्टाईल देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पासून प्रेरित होती.”
पुढे खुलासा करताना सलमान खान म्हणाला की, “त्यावेळी राहुल रॉय सुद्धा अशीच हेअरस्टाईल ठेवायचा. मला पण असं वाटायचं की, लहान शहरांमधले नायक नेहमीच लांब केसं ठेवतात. जुन्या काळातले नायक सुद्धा लांब केसं ठेवायचे. तसा माझा लूक आला आहे.” शोच्या निर्मात्यांनी अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या एपिसोडदरम्यान, सलमानने आमिर खान आणि गौरी स्प्रेटसोबतच्या नवीन नात्यामागील कारणही सांगितले. ज्यामध्ये कपिल सलमानला म्हणतो, “आमिर भाईने नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत चाहत्यांना ओळख करून दिली आहे. तो थांबणार नाही; पण तुम्ही अजूनही सुरुवात केलेली नाही.”
सलमानने कपिलला हसत हसत उत्तर दिले की, “आमिर एक वेगळाच कलाकार आहे, तो एक परफेक्शनिस्ट आहे, जोपर्यंत तो त्याचे लग्न परफेक्ट करत नाही तोपर्यंत…” हे बोलल्यानंतर सर्व जण हसायला लागतात. व्हिडीओच्या शेवटी, सलमान आणि कपिल ‘प्यार किया तो डरना क्या’ या सुपरहिट चित्रपटातलं ‘ओ ओ जाने जाना’ हे हिट गाणे एकत्र गाताना दिसत आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ३’चा पहिला भाग २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला आहे. या शोचा नवीन भाग दर शनिवारी रात्री ८ वाजता स्ट्रीम करण्यात येणार आहे.