मुंबई : ‘पिंकीचा विजय असो’(Pinkicha Vijay Aso) या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत संकर्षण कऱ्हाडेचा (Sankarshan Karhade) भाऊ अधोक्षज कऱ्हाडे (Adhokshaj karhade) लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत तो ‘बंटी’ हे पात्र साकारणार असून या भूमिकासाठी तो खूपच उत्सुक आहे.
या भूमिकेविषयी सांगताना अधोक्षज म्हणाला, ‘बंटी’ हे अतिशय कलरफुल पात्र आहे. आमची पटकथा लेखिका श्वेता पेंडसेने खूप उत्तमरित्या मला समजावली. पिंकीवर मनापासून प्रेम करणारा आणि सतत तिच्यासाठी धडपडणारा असा हा बंटी. मालिकेची टीम खूप भन्नाट आहे. त्यामुळे काम करताना मजा येतेय. आम्ही साताऱ्यातल्या एका गावात काम करतोय. त्यामुळे प्रेक्षकांचाही छान प्रतिसाद मिळतोय. स्टार प्रवाहसोबत याआधी छोटी मालकीण आणि लक्ष्य या मालिकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे बंटी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असेल.’
आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते? हे मालिकेतून पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका पिंकीचा विजय असो ३१ जानेवारीपासून रात्री ११ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.