फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता संतोष जुवेकर दरम्यान फार चर्चेत आला होता. अभिनेत्याने नुकतेच हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. विकी कौशल स्टारर चित्रपट ‘छावा’ सिनेमात, संतोष अगदी महत्वाच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर झळकला होता. यानंतर त्याच्याविषयी अनेक चर्चा रंगली! त्याने दिलेली मतं, काहींना पटलीतर काहींना नाही. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे संतोषला यंदाचा ६१वा महाराष्ट्र मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याला यंदा गौरवण्यात आलं आहे. ‘रावरंभा’ चित्रपटात त्याने केलेले उत्कृष्ट काम सार्थकी लागले आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ म्हणून पुरस्कारात करण्यात आले आहे.
अभिनेत्याचा गौरव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राने त्याचे कौतुक केले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आले आहे. अभिनेत्याने नुकतेच त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांचे आभार मानत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टखाली कॅप्शनमध्ये त्याने सुंदर असे भावुक ओली लिहल्या आहेत.
“ज्या साठी केला अट्टाहास!!! ह्या काळ्या बाहुल्या नशिबानं मिळतात पण हे नशीब घडतं ते आपल्या कामावर श्रद्धा आणि त्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना त्या नटेश्वराचा आशिर्वाद आणि तुम्हां मायबाप प्रेक्षकांची मिळालेली शाब्बासकीची पाठीवर थाप आणि तुमच नितांत प्रेम. बास मग सगळंच शक्य झालंच समजा. लक्ष असूदेरे महाराजा.” असे म्हणत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहे.
अगदी दोन दिवसांअगोदर अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. चाहत्यांनी याबद्दल अभिनेत्याने कौतुक आणि अभिनंदन केले होते. याबद्दल पोस्ट शेअर करत अभिनेत्याने “मंडळी एक आनंदाची बातमी… तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि बाप्पाच्या आशिर्वादाने ह्या वर्षाचा 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट हा मानाचा पुरस्कार सर्वत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून “रावरंभा” ह्या सिनेमा साठी जालिंदर ह्या भूमिकेसाठी मला मिळाला. पुन्हा एकदा तुम्हां सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक मायबाप आणि परीक्षकांचे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी रंगभूमी आणि चित्रपट सांस्कृतिक कार्यकारी विभागाचे आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य आणि माझ्या सिनेमाच्या सर्व टीमचे मनापासून आभार. ह्या पुरस्कारामुळे मिळालेल्या उत्तेजनाने प्रोत्साहनाने पुन्हा एकदा अजून जोमाने काम करण्याच्या प्रयत्नांचे बळ नटेश्वर मला देत राहो हीच प्रार्थना… चांग भलं” असे नमूद करत आनंद व्यक्त केला.