भारतातच नाही तर परदेशातही किंग खानचे कोट्यवधींचे बंगले, शाहरूख खानची एकूण संपत्ती किती ?
बॉलिवूडच्या किंग खानचा आज ५९ वा वाढदिवस आहे. किंग खानच्या फॅन्सची क्रेझ फक्त भारतातच नाही तर, जगभरात आहे. नेहमीच आपल्या खास अंदाजातील अभिनयामुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत राहणाऱ्या किंग खानने १९९२ मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर गेल्या ३ दशकांहून अधिकचा काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिवाय त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवरही अधिराज्य गाजवलं आहे. एका पेक्षा एक दमदार आणि सुपर डुपर हिट सिनेमे देणाऱ्या शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया…
हे देखील वाचा – बिग बॉस १८ नवा होस्ट? हा शोचा जुना स्पर्धक करणार होस्टिंग
त्याने आपल्या स्टाईलमुळे आणि दमदार अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी तर मिळवली आहे. शिवाय कोट्यवधींची कमाईही केली आहे. एकेका चित्रपटासाठी कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या शाहरुखची एकूण संपत्ती 7300 कोटी रुपये आहे.हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 च्या यादीमध्ये अभिनेत्याचा समावेश सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या व्यक्तींमध्ये झाला आहे. शाहरूख खानचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुख त्याच्या चित्रपटातून आणि वेगवेगळ्या बिझनेसमधून भरपूर कमाई करतो. त्यामुळेच तो आज अतिशय आलिशान आयुष्य जगतो. त्याच्याकडे फक्त भारतातच नाही तर, परदेशातही अनेक अलिशान घरे आहेत. त्याशिवाय त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचा संग्रह सुद्धा आहे.
शाहरूख खान मुंबईच्या बांद्रामध्ये असलेल्या मन्नत बंगल्यामध्ये राहतो. त्याच्या घराला भेट देण्यासाठी दररोज देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारो लोकं येतात. शाहरूखच्या घराबाहेर नेहमीच पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्याच्या ह्या बंगल्याची किंमत २०० कोटी रूपये आहे. त्याच्या ह्या अलिशान बंगल्यामध्ये, अलिशान बेडरूम, लिव्हिंग एरिया, जिम, स्विमिंग पूल, पर्सनल ऑफिस, लायब्ररी, प्रायव्हेट मूव्ही थिएटर, ऑडिटोरियम, वॉक-इन वॉर्डरोब सह अनेक प्रशस्त सुविधा आहेत. शाहरुखचे हे ड्रीम होम त्याची पत्नी गौरी खानने स्वतः डिझाइन केले आहे. ती पेशाने चित्रपट निर्माती असून फॅशन डिझायनरही आहे. शाहरूखचे फक्त मुंबईतच घर नसून अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची घरं आहेत. शाहरूखचं बालपण दिल्लीत गेले. तो लहानाचा मोठा तिकडेच झाला. तिथे त्याचा फार मोठा बंगलाही आहे. तोही गौरी खाननेच डिझाईन केला आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखचे भारताव्यतिरिक्त लंडनमध्ये आणि दुबईमध्ये पाम जुमेराह येथेही एक लक्झरी व्हिला आहे. दुबईच्या या भागात जगातील अनेक श्रीमंत लोक वास्तव्यास आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीमध्ये भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत शाहरुखच्याही नावाचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, तो एका चित्रपटासाठी १०० ते १२० कोटी रुपये मोजतो. अनेक रिपोर्ट्समध्ये शाहरुख खानची फी २५० कोटी रुपये असण्याची शक्यताही वर्तवली आहे. शाहरूख फक्त चित्रपटांतूनच कमावत नाही तर, ब्रँड एंडोर्समेंट, आयपीएल आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट हे त्याच्या मालकीचं प्रॉडक्शन हाऊस असून या माध्यमातून ती सर्वाधिक कमावतो. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख रेड चिलीज एंटरटेनमेंट या त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून दरवर्षी 500 कोटी रुपये कमावतो. तर केकेआर ह्या आयपीएल टीमच्या माध्यमातून तो दरवर्षी २५० ते २७० कोटी रुपये कमवतो.
शाहरुख खानला अनेक लक्झरियस कारचीही आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये जगातील सर्वात महागड्या गाड्यांचा समावेश आहे. त्याच्कडे, रोल्स-रॉइस कलिनन, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, रोल्स-रॉइस फँटम ड्रॉपहेड कूप, रेंज रोव्हर स्पोर्ट, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, बीएमडब्ल्यू 6-सीरीज कन्व्हर्टेबल, ऑडी ए8 एल, टोयोटा लँड क्रूझर आणि ह्युंदाई क्रेटा कारचा समावेश आहे.