Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shah Rukh Khan : अतिश्रीमंतांच्या बॉलिवूडच्या किंग खानला मिळालं स्थान! शाहरुख खानची संपत्ती ऐकलीत का?

किंग खानने पहिल्यांदाच हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत स्वतःचं नाव नोंदवलं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी शाहरुख खानकडे ७,३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 30, 2024 | 03:33 PM
अतिश्रीमंतांच्या बॉलिवूडच्या किंग खानला मिळालं स्थान! शाहरुख खानची संपत्ती ऐकलीत का?

अतिश्रीमंतांच्या बॉलिवूडच्या किंग खानला मिळालं स्थान! शाहरुख खानची संपत्ती ऐकलीत का?

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरात प्रचंड मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. त्याच्या अभिनयाची चर्चा फक्त देशातच नाही तर जगभरात होते. शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग खान म्हणून संबोधलं जातं. सध्या बॉलिवूडचा किंग खान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या चर्चेत येण्याचे प्रमुख कारण ठरलंय त्याची संपत्ती…. किंग खानने पहिल्यांदाच हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत स्वतःचं नाव नोंदवलं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी शाहरुख खानकडे ७,३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे.

हे देखील वाचा – प्रियांका, आलिया अन् कतरिनाच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाला का होतोय उशीर? झोया अख्तरने सांगितले कारण!

विशेष म्हणजे शाहरुखची गेल्या वर्षभरात इतकी संपत्ती वाढली आहे. गेल्या वर्षी किंग खानचे जवळपास तीन चित्रपट एका पाठोपाठ एक रिलीज झाले आहेत. ‘पठान’ आणि ‘जवान’ ला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. पण ‘डंकी’ चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. किंग खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर, कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एन्टरटेनमेंटमुळे शाहरुख खान श्रीमंतांच्या यादीत विराजमान झाला आहे. मुख्य बाब म्हणजे अभिनेता उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या सोबत श्रीमंतांच्या यादीत आहे.

 

India’s Biggest SUPERSTAR #SRK debuted on the Hurun India Rich list with a net worth of ₹7,300 crore in 2024🔥🔥🔥 @iamsrk pic.twitter.com/kvzte3x6pq

— CineHub (@Its_CineHub) August 29, 2024

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या संपत्तीत चित्रपटांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि कोलकाता नाईट रायडर्सला मिळालेल्या विजयानंतर संपत्तीमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. एका वर्षभरात शाहरूख खानच्या संपत्तीत एक हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आहेत. तर हुरून इंडिया रिच लिस्टमध्ये शाहरूख खान अव्वल ठरला आहे. फोर्ब्स २०२३च्या अहवालानुसार, शाहरूखची २०२३ मध्ये एकूण संपत्ती ६, ३०० होती. एका वर्षात शाहरूखच्या संपत्तीत एक हजार कोटींची वाढ झालीये.

हे देखील वाचा – प्रिया एटलीने “रेड नॉट” नावाचा नवीन अन् बोल्ड फॅशन ब्रँड केला लाँच!

अभिनेत्याच्या कमाईमध्ये वाढ जाहिरात आणि चित्रपटांच्या माध्यमातून होते. शिवाय, चित्रपटाच्या होणाऱ्या नफ्यामध्ये, शाहरूखचा मोठा वाटा असतो. शिवाय शाहरूख वर्षाला रेड चिलिज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातूनही कोट्यवधींची कमाई करतो. हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडरची को-ओनर आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला आहे. जुही चावलाची संपत्ती ४,६०० कोटी इतकी आहे. जुही चावलानंतर अभिनेता हृतिक रोशनचा समावेश होतो. त्याकडे २००० कोटी रुपयांची संपत्ती आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब यादीत चौथ्या स्थानी आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाकडे १,६०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर पाचव्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती १४०० कोटी रुपयांची आहे.

Web Title: Shah rukh khan tops as richest actor in hurun india rich list 2024 debuts juhi chawla hrithik roshan amitabh bachchan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 03:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.