(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
जिंदगी ना मिलेगी दोबारा नंतर फरहान अख्तर पुन्हा एकदा बी-टाऊन त्रिकूट घेऊन येत आहे. यावेळी तीन नायिकांच्या प्रवासाची कथा असणार आहे. फरहानने 2021 मध्ये जी ले जरा ची घोषणा केली होती, परंतु आजपर्यंत चित्रपट पुढे गेला नाही. या चित्रपटाच्या शूटिंगचे अपदेतदेखील काही मिळाले नाही आहे.
बॉलीवूडमधील हिट त्रिकूट ‘जी ले जरा’ मध्ये दिसणार
फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. चित्रपटाच्या स्टारकास्टचीही घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग तीन वर्षांपासून प्रलंबित आहे.
चित्रपट रद्द झाल्याची बातमी आली समोर
‘जी ले जरा’ हा चित्रपट रद्द झाल्याची बातमी आता समोर आली आहे. प्रियांका चोप्राने चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्याने तिने चित्रपटाला नकार दिल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. मात्र, हे वृत्त फरहानने फेटाळून लावले. आता झोया अख्तरने सांगितले आहे की जी ले जराला उशीर का होतोय? याचे कारण झोया अख्तरने स्पष्ट केले आहे.
चित्रपटाला उशीर का होतोय?
अलीकडेच झोया अख्तर तिचे वडील जावेद अख्तर यांच्यासोबत एक्सप्रेसो कार्यक्रमात सहभागी झाली होती. द आर्चीजच्या दिग्दर्शकाने जी ले जराच्या विलंबाबद्दल सांगितले आहे की तिन्ही अभिनेत्रींच्या तारखा जुळत नाहीत. ती म्हणाली की, “मला वाटतं त्या तिघांच्या (कतरिना, आलिया, प्रियांका) आणि फरहानच्या सगळ्यांच्या तारखा एकत्र ठेवल्या पाहिजेत.” असे तिने सांगितले.
हे देखील वाचा- प्रिया एटलीने “रेड नॉट” नावाचा नवीन अन् बोल्ड फॅशन ब्रँड केला लाँच!
कतरिना, प्रियांका आणि आलियाचा वर्क फ्रंट
प्रियांका चोप्रा सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने द ब्लफ आणि हेड्स ऑफ स्टेट सारख्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले. दरम्यान, आलिया भट्ट जिगराच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कतरिना कैफबद्दल बोलायचे झाले तर ती टायगर वर्सेस पठाणमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.