Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शंकराचा बाळ आला’ सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम! गाणं चर्चेत

वैशाली माडे यांच्या सुरेल आवाजातील ‘शंकराचा बाळ आला’ हे गीत भक्ती, कुटुंबप्रेम आणि देशभक्तीचा सुंदर संगम साजरा करतं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 02, 2025 | 08:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तीचा नवा स्वर घेऊन वैशाली माडे यांच्या आवाजातील ‘शंकराचा बाळ आला’ हे गीत प्रदर्शित झाले आहे. पीसफुल बिट्स प्रॉडक्शन्स निर्मित या गाण्याला मंदार चोळकर यांनी ओजस्वी शब्दरचना दिली असून, वरुण लिखाते यांनी संगीतबद्ध केले आहे. वैशाली माडे यांच्या सुरेल आणि भावपूर्ण आवाजाने या गीताला भक्तीभावाची आणि उत्सवाची खरी अनुभूती दिली आहे.

बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना वादात सापडला ‘LoKah’, निर्मात्यांना मागावी लागली माफी

गाण्यातील कथा ही विशेष आहे. निसर्गरम्य कोकणातील गणेशोत्सवाचे चित्रण यात आहे, मात्र या उत्सवी वातावरणात एक भावनिक बाजू गुंफली आहे – एका सैनिक आईची कथा. गणेशोत्सवासाठी घरी आलेली ही आई बाप्पाची सेवा पूर्ण भक्तिभावाने करते आणि नंतर देशसेवेसाठी पुन्हा निघते. तिच्या त्यागातून भक्ती, कुटुंब आणि देशभक्ती या तिन्हींचा सुंदर संगम दिसतो. या कथेमुळे हे गाणं केवळ उत्सवी नसून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारे ठरते.

गीतामध्ये योगिता चव्हाण यांचा भावपूर्ण चेहराभाव, अभिजीत केळकर यांची ऊर्जा आणि लहानग्या आरव आयेरचा निरागस आनंद यांनी गाण्याला प्रेक्षकांच्या मनाजवळ आणले आहे. ढोल-ताशांचा गजर, फुलांच्या सजावटीतला रंग, आरत्यांचा स्वर आणि प्रसादाचा सुवास यातून उलगडलेले वातावरण प्रत्येकाला आपल्या घरच्या गणेशोत्सवाची आठवण करून देते. दिग्दर्शक पराग सावंत यांनी सांगितले की, “या गाण्यात प्रत्येक फ्रेममध्ये भक्तीभाव आणि उत्सवाचा आत्मा पकडण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत, दृश्य आणि भावना यांच्या संगमातून प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी आम्हाला खात्री आहे.”

New OTT Release: चाहत्यांसाठी खुशखबर! Saiyaara ते Coolie सह हे 5 चित्रपट आता OTT वर घालणार धुमाकूळ

गायिका वैशाली माडे म्हणतात, “गणेशभक्तीचा स्वर हा माझ्या गायकीचा अविभाज्य भाग राहिला आहे. ‘शंकराचा बाळ आला’ हे गीत भक्तीची अनुभूती देणारं आहे. यात शब्द, सूर आणि भावनांचा अनोखा मिलाफ आहे, जो श्रोत्यांना थेट गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात घेऊन जातो. हे गाणं गणेशभक्तांच्या हृदयात दीर्घकाळ गुंजत राहील, असा मला विश्वास आहे.” हे गीत गणेशोत्सवात भक्ती, कुटुंबप्रेम आणि देशभक्तीची नवी भर घालणारं ठरलं आहे.

Web Title: Shankaracha bal aala is a beautiful blend of melody faith and emotions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 08:22 PM

Topics:  

  • News Song

संबंधित बातम्या

अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘येरे येरे पैसा ३’ मधलं ‘उडत गेला सोन्या’ थेट हृदयाला भिडणारं गाणं प्रदर्शित
1

अमेय खोपकरच्या लेकाचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘येरे येरे पैसा ३’ मधलं ‘उडत गेला सोन्या’ थेट हृदयाला भिडणारं गाणं प्रदर्शित

प्रेक्षकांच्या गुलाबी मनाला भावनारं “गुलाबी ऋतू” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा
2

प्रेक्षकांच्या गुलाबी मनाला भावनारं “गुलाबी ऋतू” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा

प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित, ‘गाडी नंबर १७६०’ मध्ये झळकणार प्रथमेश- प्रियदर्शिनीची फ्रेश जोडी
3

प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित, ‘गाडी नंबर १७६०’ मध्ये झळकणार प्रथमेश- प्रियदर्शिनीची फ्रेश जोडी

‘चाल तुरु तुरु’नंतर निक शिंदेचं नवं गाणं येतंय, पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली
4

‘चाल तुरु तुरु’नंतर निक शिंदेचं नवं गाणं येतंय, पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.