
मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेतील ‘मोस्ट अवेटेड वेडिंग’ म्हणजे शशांक आणि अपूर्वाच (shashayank and apoorva) लग्न. या दोघांच्या लग्नाची कानेटकर (Kanetkar) आणि वर्तक (Vartak) कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून या लग्नसोहळ्यात स्टार प्रवाहचा (Star Pravah) संपूर्ण परिवार उपस्थित रहाणार आहे. लग्नसोहळा म्हंटल की आपल्या परिवाराशिवाय तो पूर्णच होत नाही. त्यामुळेच या खास सोहळ्यात स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. सुनील बर्वे, सौन्दर्या इनामदार म्हणजे हर्षदा खानविलकर या स्टार प्रवाहवरील कुटुंबातील सदस्य केळवण, मेहेंदी आणि हळदीला आवर्जून उपस्थित होते. .
जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले तरी दोघांना एकत्र जोडून ठेवणारा दुवा म्हणजे कुटुंबावरचं प्रेम. याच कुटुंबावरच्या प्रेमाने दोघांना एकत्र यायला भाग पाडलं आहे. लग्न म्हणजे दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं.
एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतला हा विवाहसोहळा फक्त वर्तक आणि कानेटकर परिवारच नाही तर संपूर्ण प्रवाह परिवार साजरा करणारा आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ठिपक्यांची रांगोळी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
नुकताच या मालिकेने 100 भागांचा टप्पाही पूर्ण केला आहे.