Shilpa Shetty Fitness Photos
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या चाहत्यांच्या मनावर अभिनयातून आणि फॅशनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर जिममध्ये वर्कआऊट करणारे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या फिटनेसची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीने ब्लॅक आऊटफिट वेअर करत इन्स्टाग्रामवर जिममध्ये वर्कआऊट करत असतानाचे फोटो शेअर केले आहेत. पन्नाशीच्या उंबरठ्यार असलेल्या शिल्पाची आरोग्याप्रती असलेली ऊर्जा आणि तंदुरुस्ती बघून तिच्या फिटनेसचे कौतुक केले जात आहे. शिल्पा शेट्टी हिचा नियमित घेत असलेला निरोगी आहार आणि व्यायाम हे तिच्या फिटनेसचे मोठे रहस्य आहे.
तिने जिममधील फोटो शेअर केल्यानंतर शेवटी एक प्रेरणादायी ओळ शेअर केली आहे. ती म्हणते, "आजचा सोमवार आहे, मी आनंदित आहे, सध्याचा आठवडा खूप आनंदित जाईल यासाठी मला आशिर्वाद द्या..." अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
शिल्पा शेट्टी कायमच आपल्या दररोजच्या आहारात संतुलित आणि निरोगी आहारावर विशेष भर देते. डायटिंगच्या ऐवजी अभिनेत्री पौष्टिक आहाराला सर्वाधिक पसंदी देते. तिच्या दररोजच्या आहारात प्रथिने आणि हेल्दी कार्बन युक्त पदार्थांचा सर्वाधिक समावेश असतो.
सर्वाधिक फॅट्स असलेल्या पदार्थांचा अभिनेत्रीने आपल्या आहारातून वापर करणं बंद केलं आहे. एकाच वेळी जास्त न जेवता दिवसातून अभिनेत्री ५ ते ६ वेळा कमी प्रमाणात जेवते. यामुळे त्यांचे चयापचय वाढते आणि एनर्जी लेव्हलही टिकून राहते.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी अभिनेत्री जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करते. शिवाय, ज्युस आणि भाज्यांच्या ज्युसचे देखील ती सेवन करते. सोबतच, अभिनेत्री कायम हंगामी फळांचा आपल्या आहारात जास्तीत वापर करण्याचा प्रयत्न करते.