Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिल्पा शेट्टीचा परदेशी दौरा बंद! “आधी भरा ६० कोटी, करा सही आणि मग फिरा देशाबाहेर”

शिल्पा शेट्टीला ₹60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले, “परदेशात जायचे असेल तर आधी सरकारी साक्षीदार बना आणि ₹60 कोटी परत करा.”

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 14, 2025 | 08:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला बॉम्बे हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. तिच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) जारी केलेले लुकआउट नोटीस रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. हे नोटीस ₹60 कोटींच्या फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे, ज्यात तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा मुख्य आरोपी आहे. शिल्पा शेट्टीने न्यायालयात दावा केला होता की, तिला राज कुंद्राच्या कंपनीशी काहीही देणंघेणं नाही आणि ती फक्त नाममात्र संचालक होती. मात्र, मुख्य न्यायाधीश श्रीचंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने तिचा दावा फेटाळला. न्यायालयाने टिप्पणी केली, “जर तुम्हाला परदेशात जायचे असेल, तर आधी सरकारी साक्षीदार बना.”\

“महाराष्ट्रात राहायची लायकी नाही…”, ट्रोलरच्या घाणेरड्या कमेंटचा दिशा परदेशीने शेअर केला स्क्रीनशॉट, म्हणाली,…

न्यायालयाने शिल्पा शेट्टीला 16 ऑक्टोबरपर्यंत लेखी प्रतिज्ञापत्र (affidavit) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच न्यायालयाने म्हटले, “जर तुम्ही म्हणत आहात की कंपनीशी तुमचा काही संबंध नाही, तर तुमचे पती राज कुंद्रानेही त्या दाव्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे.” त्याचबरोबर न्यायालयाने स्पष्ट केले की, सर्वप्रथम तक्रारदाराला देय असलेली ₹60 कोटींची रक्कम जमा करावी.

हे प्रकरण 2015 ते 2023 या कालावधीत बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या आता बंद झालेल्या कंपनीशी संबंधित आहे. व्यापारी दीपक कोठारी यांनी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर सुमारे ₹60 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. कोठारी यांचे म्हणणे आहे की, या दोघांनी त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले आणि नंतर निधी वैयक्तिक वापरासाठी वळवला.

एक वेळची स्टार, आता मदतीची गरज!, रानू मंडलची ५ वर्षांनंतर झाली दयनीय अवस्था, पाहा फोटो

ईओडब्ल्यूच्या चौकशीत राज कुंद्राने सांगितले की, कंपनीला नोटाबंदीच्या काळात मोठे नुकसान झाले, त्यामुळे कर्ज फेडणे शक्य झाले नाही. या प्रकरणात कुंद्राची दोनदा आणि शिल्पा शेट्टीची 4 तास चौकशी झाली आहे. या दाम्पत्याने लुकआउट नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती, जेणेकरून त्यांना व्यावसायिक कारणांमुळे आणि पर्यटनासाठी परदेश प्रवास करता येईल. मात्र न्यायालयाने ही मागणी नाकारली. न्यायालयाने सांगितले की, जेव्हा दोघांवर फसवणुकीचा आरोप आहे, तेव्हा अशा प्रवासास परवानगी देता येणार नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की, सध्या अटक न करण्याचे कारण त्यांचा तपासात सहयोग आहे; पण पुढील दिलासा तेव्हाच मिळेल, जेव्हा ₹60 कोटींची संपूर्ण रक्कम जमा केली जाईल.

Web Title: Shilpa shettys foreign tour cancelled by indian court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • Shilpa Shetty

संबंधित बातम्या

‘नोटबंदीमुळे नुकसान झालं, म्हणून कंपनीने…’, ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचे स्पष्टीकरण
1

‘नोटबंदीमुळे नुकसान झालं, म्हणून कंपनीने…’, ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचे स्पष्टीकरण

फसवणूक प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या वाढल्या अडचणी, परदेशात जाण्यास न्यायालयाने दिला नकार
2

फसवणूक प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या वाढल्या अडचणी, परदेशात जाण्यास न्यायालयाने दिला नकार

६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणात शिल्पा शेट्टीचा नोंदवला जबाब, EOW ने अनेक तास केली चौकशी
3

६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणात शिल्पा शेट्टीचा नोंदवला जबाब, EOW ने अनेक तास केली चौकशी

६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी पोलिसांनी नोंदवला राज कुंद्राचा जबाब, लवकरच करणार कारवाई
4

६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी पोलिसांनी नोंदवला राज कुंद्राचा जबाब, लवकरच करणार कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.