(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे गाणे गाताना रानू मंडल रातोरात व्हायरल झाली होती. तिचा गोडवा आवाज आणि साधेपणा लोकांच्या मनावर घर करून गेला. देशाच्या कोपऱ्यातून अनेक लोक तिला भेटण्यासाठी आणि तिचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी येऊ लागले होते. हिमेश रेशमियाने तिला चित्रपटात गाण्याची संधी दिली, तर अनेक रिअॅलिटी शोमध्येही तिने हजेरी लावली. त्यामुळे रानू मंडल लगेचच सेलिब्रिटी गायिका म्हणून प्रचंड लोकप्रिय झाली.
परंतु, प्रसिद्धीच्या या चमकदार फटाक्याखाली तिचं आयुष्य आता फारसे सुखी नाही. सध्या ती कोलकात्याजवळील रानाघाट गावात अत्यंत दयनीय परिस्थितीत राहते. तिला रोजच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्थित सोय नाही.
रानू मंडलला अचानक मिळालेल्या या यशाला टिकवून ठेवणं तिला जमले नाही. मॅनेजर आणि काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे ती ‘ऐश्वर्यापासून गरिबीत’ आलेली आहे. सोशल मीडियावर तिच्यावर खूप टीका आणि ट्रोलिंगसुद्धा झाले आहे. लोकांना तिची ही अवस्था पाहून खूप दया वाटते.
प्रसिद्धी आणि संपत्ती सहज मिळत नाही, आणि ज्याला मिळते तोच ती सांभाळू शकतो.रानू मंडलच्या मधुर आवाजावर संपूर्ण देश फिदा झाला होता. रेल्वे स्टेशनवर गाताना तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिला अचानक लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिला अनेक रिअॅलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आले. २०२० मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘हॅपी हार्डी अँड हीर’ या चित्रपटात तिने गाणे गायले, ज्यामुळे तिचं करिअर आणखी उंचीवर गेलं.
पण काही काळानंतर रानू मंडलच्या वागण्यात बदल दिसू लागला. सोशल मीडियावर तिचे असे व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात ती चाहत्यांशी भडकून बोलताना आणि चुकीच्या पद्धतीने वागताना दिसली. यामुळे लोकांच्या मनात तिच्याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया निर्माण झाली आणि तिला मोठ्या प्रमाणावर टीका सहन करावी लागली. या टीकेमुळे आणि तिच्या वर्तनामुळे ती लोकांच्या नजरेतून दूर झाली आणि तिची प्रसिद्धी कमी होऊ लागली.
‘स्मार्ट सुनबाई’चा धमाकेदार टीझर लाँच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शन!
५ वर्षांनंतर रानू मंडल कोलकात्याजवळील रानाघाटमध्ये आढळली, जिथे तिचं जीवन अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. यूट्यूबर निशू तिवारी तिथे पोहोचून तिची अवस्था दाखवली आहे. घरात सगळीकडे सामान विखुरलेलं, कचरा पसरलेला आणि दुर्गंधी असल्याचं दिसतं.
रानू मंडलची मानसिक स्थितीही बिघडलेली आहे; तिला काहीही आठवत नाही, बोललेलं ५ मिनिटांत विसरते, असे यूट्यूबरने सांगितले. तिच्याकडे उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही, आणि कुटुंबातील कोणताही सदस्यही तिच्यासोबत नाही. तिचा उदरनिर्वाह आता इतरांच्या मदतीवर चालत आहे. जे लोक तिला भेटायला येतात, ते तिच्यासाठी खाण्यापिण्याचे सामान किंवा पैसे देऊन जातात.