(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सोशल मीडियावर कलाकारांवर ट्रोलिंग करणं काही नवीन राहिलेलं नाही. बऱ्याच सेलिब्रिटींनी या टोकाच्या अनुभवांमुळे सोशल मीडियापासून अंतर ठेवलं, पण काहीजण मात्र या ट्रोलर्सना जशास तसे उत्तर देत आपला आत्मसन्मान टिकवून ठेवतात.
‘लाखात एक आमचा दादा’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा परदेशी हिच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं.काही महिन्यांपूर्वी आजारपणामुळे मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर दिशाने नव्या जोमाने पुनरागमन केलं असून, आता ती निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकत आहे.ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून, तिचे वैयक्तिक व प्रोफेशनल अपडेट्स नेहमीच चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. काही दिवसांपूर्वी तिने बिकिनीतील फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले.
हे फोटो चाहत्यांना आवडले असले तरी, एका नेटकऱ्याने असभ्य व घाणेरडी कमेंट केली,“महाराष्ट्रात राहायची लायकी नाही तुमची…हिंदू धर्माची आणि मराठी कल्चरची XX XXX टाका, हे देवा आम्हाला काय- काय बघावं लागत आहे.” अशा दोन कमेंट्स या नेटकऱ्याने अभिनेत्रीच्या फोटोंवर केल्या होत्या. याचे स्क्रीनशॉट शेअर करत दिशा लिहिते, “या माननीय महोदयांना आता काय रिप्लाय देऊ हे मला समजत नाहीये… आपल्याला काही समजत असेल तर मला सांगावे…”
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
MTV चे पाच म्युझिक चॅनल्स होणार बंद? पॅरामाउंटचा मोठा निर्णय, काय आहे यामागचं कारण?
मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिने तिच्या बिकिनी फोटोशूटवर आलेल्या अश्लील आणि धर्म-जातीय द्वेष पसरवणाऱ्या कमेंट्स विरोधात थेट आवाज उठवला आहे.दिशाने त्या कमेंटचा स्क्रीनशॉट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
तिने नुकताच निर्माता म्हणूनही पदार्पण केले असून तिचा नव्या निर्मिती क्षेत्रात सहभाग म्हणजे तिच्या करिअरचा एक नवा टप्पा आहे. अभिनेत्री म्हणून तसेच निर्माता म्हणून तिने अनेक नवीन प्रोजेक्ट्सवर काम सुरू केले आहे. सोशल मीडियावर ती सतत चाहत्यांशी संपर्क साधते आणि तिच्या कामाच्या अपडेट्स देत राहते.