Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कायद्यावर आधारित पहिल्या नाट्यकृतीच्या ट्रेलर लॉन्च, अमेझॉन ओरिजनल सिरीज ‘गिल्टी माईंड्स’मध्ये झळकणार श्रिया पिळगांवकर आणि वरूण मित्रा

ही नाट्यमालिका करण्यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडिओपेक्षा दुसरा कोणताही सहयोगी सापडला नसता. ही कलाकृती जगभरातील प्रेक्षकांना पाहता येईल. ही नाट्यकृती तयार करताना जितकी मजा आली, तितकीच ती प्रेक्षकांना आवडेल ही आशा वाटते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 09, 2022 | 03:23 PM
कायद्यावर आधारित पहिल्या नाट्यकृतीच्या ट्रेलर लॉन्च, अमेझॉन ओरिजनल सिरीज ‘गिल्टी माईंड्स’मध्ये झळकणार श्रिया पिळगांवकर आणि वरूण मित्रा
Follow Us
Close
Follow Us:

प्राईम व्हिडिओ च्यावतीने आज कायद्यावर आधारित आगामी कलाकृती, अमेझॉन ओरिजनल सिरीज गिल्टी माईंड्सच्या ट्रेलरचे प्रकाशन करण्यात आले, यामध्ये श्रिया पिळगांवकर आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत. या कलाकृतीची निर्मिती आणि दिग्दर्शन शेफाली भूषणने केले असून जयंत दिगंबर सोमाळकर सह-दिग्दर्शक आहे. दोन तरूण आणि महत्त्वाकांक्षी वकिलांचा प्रवास या नाट्यातून उलगडतो. यातील एक व्यक्ति म्हणजे सदाचाराचे प्रतीक तर दुसरी व्यक्ति अग्रगण्य लॉ फर्ममध्ये कार्यरत असते, या व्यक्तिरेखेला अनेक ‘ग्रे शेड्स’ आहेत. या मालिकेत नम्रता शेठ, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा, सतीश कौशिक, बेंजामिन गिलानी, विरेन्द्र शर्मा, दीक्षा जुनेजा, प्रणय पचौरी, दीपक कालरा आणि चित्रांगदा सतरूपा यासारखे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्याचप्रमाणे करिश्मा तन्ना, शक्ति कपूर, सुचित्रा कृष्णमूर्ती, गिरीश कुलकर्णी आणि सानंद वर्मा हे अभिनेते मुख्य भूमिकेत आणि पाहुणे कलाकार म्हणून दिसतील.

मुंबईमधील प्रतिष्ठीत महाविद्यालयात, संस्थेचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, यावेळी सहभागी सदस्य चर्चेत वकील मोनिका दत्ता, रवींद्र सूर्यवंशी, निर्माती आणि दिग्दर्शक शेफाली भूषण, कलाकार श्रिया पिळगांवकर आणि वरूण मित्रा सामील झाले तसेच वरिष्ठ प्राध्यापक आणि अध्यक्ष, एमबीए लॉ, एनएमआयएमएस डॉ. परितोष बासू यांनी सूत्रसंचालन केले.

“माझ्याकरिता गिल्टी माईंड्स केवळ नाट्यमालिका नसून त्यापेक्षा अधिक आहे. न्यायासाठी झगडणारे दोन सशक्त वकील आणि त्यांच्या अशीलांची ही कथा आहे. माझ्या कुटुंबाकडून कायद्याविषयीची जी शिकवण मला मिळाली, त्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. माझ्या घरी रात्रीच्या जेवणादरम्यान कायदा हा विषय चर्चेत केंद्रस्थानी असे, त्यात वातावरणात मी लहानाची मोठी झाले. मलाही कायम याच विषयाचे कुतूहल वाटत आले. कायदा व्यवस्थेवर एखादी वास्तववादी कलाकृती करण्याची इच्छा मनोमन होती. विविध केसच्या शोध घेत गिल्टी माईंड्सने आकार घेतला”, असे गिल्टी माईंड्सची निर्माती आणि दिग्दर्शिका शेफाली भूषण म्हणाली. “ही नाट्यमालिका करण्यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडिओपेक्षा दुसरा कोणताही सहयोगी सापडला नसता. ही कलाकृती जगभरातील प्रेक्षकांना पाहता येईल. ही नाट्यकृती तयार करताना जितकी मजा आली, तितकीच ती प्रेक्षकांना आवडेल ही आशा वाटते.”

जयंत दिगंबर सोमाळकर सह-दिग्दर्शित आणि करण ग्रोव्हर, अंतरा बॅनर्जी व नावेद फारूकी प्रस्तुत गिल्टी माईंड्सचे विशेष स्ट्रीम 22 एप्रिल 2022 पासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर करण्यात येणार आहे.

Web Title: Shriya pilgaonkar and varun mitra to star in amazon original series guilty minds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2022 | 03:23 PM

Topics:  

  • Amezon Prime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.