siddharth kiara
सध्या सगळीकडे बॉलिवूडमधल्या एकाच जोडप्याची चर्चा सुरु आहे ते जोडपं म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा (Kiara Advani). नुकतंच सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितलं की ‘आता आमच्यात काही लपवण्यासारखे नाही’. आता त्यांच्या लग्नाची (Siddharth And Kiara Wedding) तारीख ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे ६ एप्रिल २०२३ रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. दोघांचा विवाह सोहळा दिल्लीत पार पडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोघांच्या घरातील लोकांनी लग्नाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. दोघे आधी कोर्टात लग्न करणार आहेत त्यानंतर नातेवाईक, पाहुण्यांसाठी स्वागत समारंभ ठेवणार आहेत.
[read_also content=”नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीनिमित्त मिळणार ‘इतका’ बोनस https://www.navarashtra.com/maharashtra/diwali-bonus-annoucement-for-navi-mumbai-municipal-corporation-workers-nrsr-335390.html”]
या क्यूट कपलने २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केलं. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करू लागले. नुकतेच दोघे एका जाहिरातीत झळकले आहेत. सध्या ते दोघे एकत्र वेळ घालवत आहेत.
कियारा आगामी काळात ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहे, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर विद्वांस या दिग्दर्शकावर आहे.‘शेरशाह’ चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एका सैनिकाचे पात्र साकारणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘योद्धा’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ सैन्यातील एका जवानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.