फोटो सौजन्य - Social Media
अभिनय सोडून जवळ जवळ दोन दशके उलटली. स्मृती इराणी पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्यास सज्ज झाल्या आहेत. २९ जुलै २०२५ रोजी ‘सांस भी कभी बहू थी २’ ही मालिका प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला अध्याय २५ वर्षांपूर्वी सुरु होता, ज्यात स्वतः स्मृती इराणी होत्या. दशकांच्या या प्रवासानंतर या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. महत्वाचे म्हणजे स्मृती इराणी पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर स्मृती इराणी यांची एक मुलाखत फार व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून अभिनय क्षेत्र सोडले? त्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे नाव सांगितले आहे. स्मृती इराणी यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या सांगण्यावरून अभिनय क्षेत्र सोडले होते याची ग्वाही दिली आहे. एका शूटिंगदरम्यान तुम्हाला दिल्लीवरून कॉल आला होता या संदर्भात मुलाखतदाराने विचारणा केली असता, स्मृती यांनी सांगितले की, “हो, त्यावेळी मी शूटिंगमध्ये होते. दिल्लीवरून मला खास शपथविधीसाठी कॉल आला होता. मुख्य म्हणजे त्यावेळी मी अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत शूटिंगमध्ये होते आणि तेच काही कॅमेरासमोरचे माझे काही शेवटच्या आठवणी आहेत.”
या गोष्टी सांगताना त्यांनी एका महत्वाच्या प्रसंगाचा उल्लेख केला. “त्या कॉलनंतर मी विचारात होती. तेव्हा स्वतः ऋषी कपूर यांनी येऊन माझी सांत्वना केली. मला देशसेवा ही सगळ्यात मोठी जनसेवा असण्याचे भाग्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कसलाही वेळ न घालवता थेट दिल्लीकडे रवाना होण्याचे आदेश दिले. तेच नव्हे तर संपूर्ण क्रू माझ्यासाठी आनंदित होती.”
एकदंरीत, अभिनेते ऋषी कपूर यांनी स्मृती इराणी यांना अभिनय क्षेत्राला सोडण्याची नव्हे तर देशसेवा म्हणून समाजकारणात जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानेच स्मृती इराणी यांनी अभिनय क्षेत्र सोडण्याचा अगदी महत्वाचा निर्णय घेतला. आता २५ वर्षांनी स्मृती इराणी अभिनय क्षेत्रात झळकणार असल्याने संपूर्ण देशाचे आणि त्यांच्या चाहतेमंडळींचे लक्ष त्यांच्याकडे लागून आहे.