'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंह जरा स्पष्टच बोलला...
अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा भन्नाट कॉमेडी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा अभिनेता “सन ऑफ सरदार” च्या सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच शुक्रवारी प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटातले कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अलीकडेच चित्रपटाच्या टीमने एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांच्यासोबत ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारले. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेता संजय दत्त नसल्यामुळे चाहते निराश झाले आहेत. या मुद्द्यावर चित्रपटातील एका कलाकाराने भाष्य केले.
स्टार परिवारवरील ‘रोमान्स की बरसात’ कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित, कोणती जोडी जिंकणार किताब?
अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिका असलेला ‘सन ऑफ सरदार’ चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या मल्टीस्टारर चित्रपटाने मोठ्या प्रमाणावर बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. तब्बल १३ वर्षांनंतर त्या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटामध्ये अजयसोबत सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, जुही चावला आणि विंधू दारा सिंह सह अनेक तगडे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. परंतु, या चित्रपटात संजय दत्त नसल्यामुळे चाहते निराश झाले आहेत. एका मुलाखतीत, अभिनेता विंदू दारा सिंहने चित्रपटात संजय दत्त का नाही? याचं कारण सांगितलंय.
“मुंबई लोकल” चित्रपटाचा कलरफुल टीजर लाँच, लाईफलाईनमधली युनिक लव्हस्टोरी खुलणार
येत्या २३ जुलैला रिलीज होणाऱ्या ‘सन ऑफ सरदार २’ मध्ये अनेक नवीन चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. प्रमोशनदरम्यान अभिनेता विधु दारा सिंहने दिलेल्या मुलाखतीत चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्त का नाही? याबद्दल खुलासा केला आहे. त्यावेळी अभिनेत्याने सांगितलं की, “चित्रपटात संजय दत्तचा रोल जवळपास फायनल झाला होता. पण चित्रपटाचं शूटिंग परदेशात होणार असल्यामुळे संजयचा व्हिजा नाकारण्यात आला होता. त्यामुळे संजयला शूटिंगला येणं शक्य नव्हतं. आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. यामुळे निर्मात्यांना स्क्रिप्टमध्ये बदल करावे लागले आणि ती भूमिका माझ्या वाट्याला आली.”
संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?
अजय देवगण, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर, १३ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. चित्रपटामध्ये, अजय देवगण पुन्हा एकदा सरदारजीच्या लूकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगन लग्नासाठी काय-काय धाडस करतोय, याची झलक आपल्याला चित्रपटात पाहायला मिळेल. चित्रपटात अजय देवगण आणि मृणाल ठाकूरसोबत रवि किशन, संजय मिश्रा, दीपक डोबरियाल, चंकी पांडे, कुब्रा सैत, विंदु दारा सिंग, मुकुल देव, शरद सक्सेना, अश्विनी कालसेकर, रोशनी वालिया यांच्यासारखे कलाकार पहायला मिळणार आहे.