Star Family Romance Ki Barsaat program
वर्षाऋतूसंबंधीच्या खास ‘सावन’ उपक्रमाअंतर्गत ‘स्टार परिवार रोमान्स की बरसात’ हा आगळावेगळा कार्यक्रम योजून ‘स्टार प्लस’ वाहिनी प्रेक्षकांना आनंद देण्याकरता सज्ज होत आहे. वेधक कथा आणि विविध मालिकांमधील लोकप्रिय जोड्यांद्वारे कुटुंबांना एकत्र आणण्याची वाहिनीची परंपरा कायम राखीत, या निमित्ताने व्यासपीठावर पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या जोड्यांचे भव्य, रोमँटिक पद्धतीचे सादरीकरण पाहण्याची करण्याची संधी स्टार प्लस वाहिनी देत आहे.
“मुंबई लोकल” चित्रपटाचा कलरफुल टीजर लाँच, लाईफलाईनमधली युनिक लव्हस्टोरी खुलणार
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोमध्ये याची झलक दिसते. रोमँटिक आणि लयबद्ध नृत्यातून आणि हृदयस्पर्शी स्वरांतून अरमान आणि अभिरा यांची जादुई केमिस्ट्री सर्वांना मंत्रमुग्ध करते, तर, सचिन आणि सायली व्यासपीठावर एक खेळकर, उत्फुल्ल वातावरणनिर्मिती करतात. त्यांचा उत्साही अभिनय वातावरणात ताजेपणा आणतो. झनक आणि ऋषी त्यांच्या अलवार नात्याचा एक खास कोमल क्षण शेअर करताना दिसतात. दरम्यान, विहान गौरीचा मूड खुलवतो, त्यांच्या नृत्यात उबदारपणा आणि प्रेम व्यापून राहिलेले दिसून येते. या उत्सवी वातावरणात अनुज स्वतः नृत्य सादर करत नसून, व्यासपीठावरील सर्वांना जल्लोष करताना, टाळ्या वाजवताना आणि प्रोत्साहन देताना दिसतो, ज्यामुळे संपूर्ण प्रोमो एका भव्य, आनंदी कौटुंबिक उत्सवासारखा वाटतो.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील अभिरा ऊर्फ समृद्धी शुक्ला ‘सावन’ उपक्रमात सहभागी झाले आहेत. आपला अनुभव सांगताना, ती म्हणते, “मला वाटते, हे जणू योगासनांसारखे असेल. जेव्हा तुम्हांला काम समजेल तेव्हा तुम्हांला कळेल की, मी ते खेळाच्या पद्धतीतून शोधून काढले आहे. पण तरीही, त्याने ते कसे केले याची अचूक परिपूर्ण प्रतिमा मिळवणे कठीण आहे. डोळ्यावर पट्टी बांधून ते पुन्हा सादर करणे कठीण आहे, परंतु मी ते कसे केले हे मला माहीत नाही. मला वाटते की, ते छान आहे. मला वाटते की, चाहत्यांना हे पाहणे खरोखर आवडेल”.
संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?
छोट्या पडद्यावरील या वेगवेगळ्या जोड्यांसोबत काम करण्याबाबत ती म्हणाली, “छान वाटतेय. सर्वांची चांगली गट्टी आहे, आणि आम्ही सर्वजण एकमेकांना ओळखतो. मात्र जेव्हा आम्ही अशा व्यासपीठावर भेटतो तेव्हा केवळ आनंददायी शुभेच्छांपेक्षा जास्त गोष्टींची देवाणघेवाण करण्याची संधी आम्हांला मिळते. आम्ही परस्परांसोबत काही वेळ व्यतीत करू शकतो. नेहमी आम्ही सर्वचजण व्यग्र असतो, मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने असे करणे शक्य होते. म्हणून खूप छान वाटतो आणि मजा येते.
Ashish Chanchlani चं ठरलं, पोस्ट शेअर करत दिली प्रेमाची कबुली! या अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात
प्रेम आणि उत्सव साजरा करण्यासाठी ‘स्टार प्लस’ वाहिनीचे व्यासपीठ सज्ज असून, या कार्यक्रमात कोणती जोडी लक्षवेधी ठरेल, हे पाहण्याकरता प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रेमाची रंगत आणि त्यासोबतची मौज अनुभवायला विसरू नका. १३ जुलै रोजी रात्रौ ७ ते ९ दरम्यान केवळ ‘स्टार प्लस’वर ‘स्टार परिवार रोमान्स की बरसात’ नक्की पाहा.






