मुंबई : मोठ्या पडद्यापासून ते छोट्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवणारा अभिनेत अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ‘कालसूत्र- प्रथम द्वार मृत्यूदाता’ (Kaalsutra Pratham Dwaar Mrityudata)या वेब सीरिजमधून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजची निर्मिती स्वत: सुबोधच करणार आहे.
[read_also content=”राष्ट्रकुल पदक विजेत्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यसरकारकडून बक्षिसाच्या रकमेत वाढ https://www.navarashtra.com/sports/good-news-for-commonwealth-medalists-increase-in-prize-money-from-the-state-government-319820.html”]
सुबोधनं सोशल मिडियावरून त्याच्या या वेब सीरिज पोस्टर शेयर केलं असून त्याच्या त्याच्या टीझरला सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. या सीरिजच्या पहिल्या पोस्टरमध्ये सुबोध आणि अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) एकमेकांसमोर दिसत आहेत. जानेवारी 2023 मध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘2020 लॉकडाऊनच्या काळात सलील देसाई यांची एक रहस्य कादंबरी वाचनात आली. ती वाचून ठरवलं की ही आपल्याला करता आली पाहिजे. आज कादंबरी वाचून दोन वर्षानंतर त्यावर आधारित मराठीमधील पहिल्या भव्य अशा वेब सीरिजची घोषणा करताना मनस्वी आनंद होतोय,’ अशी पोस्ट सुबोधने लिहिली आहे.