Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर! ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा

पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 08, 2022 | 03:19 PM
रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर! ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

अठरापगड जाती-जमातीच्या शूर मावळ्यांना सोबत घेत शिवरायांनी जाज्वल्य इतिहास घडविला. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत. अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा मराठी रुपेरी पडदयावर पुढच्या वर्षी १७ फेब्रुवारी २०२३ ला येण्यासाठी सज्ज होत आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.

[read_also content=”बारावीच्या निकालात मुलीचं सरस https://www.navarashtra.com/maharashtra/girls-clever-in-twelth-result-nrgm-290000.html”]

१६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे’ त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘पावनखिंड’ सारखा वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटही भव्यदिव्य असेल. चित्रपटासंबंधित इतर घोषणा लवकरच करण्यात येणार आहेत.

Web Title: Success story of narveer murarbaji deshpande on silver screen veer murarbaji movie announcement nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2022 | 03:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.