
सनी लिओन हे नाव केवळ सिनेमाक्षेत्रात नाही तर, उद्धोगक्षेत्रातसुद्धा गाजत आहे. सनी लिओन ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सनीने आतापर्येंत अनेक हिंदी आणि तामिळ चित्रपटात काम करून आपला कामाचा दर्जा वाढवला आहे. तिचे सगळे चित्रपट हे चित्रपटगृहात सुपरहिट ठरले आहेत. तसेच सनीने अनेक हिंदी शो तसेच OTT प्लॅटफॉर्मवरील शो मध्ये जज म्हणून आपले कर्त्यव्य पार पाडले आहे. याचदरम्यान ती तिचा तामिळ चित्रपट चाहत्यांसाठी घेऊन येण्यास सज्ज झाली आहे. सनी लिओनीने तिच्या सोशल मीडियावर ‘कोटेशन गँग’ या तमिळ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.
सनी कोटेशन गँग या चित्रपटात प्रिया मणीच्या पात्रासोबत दिसणार आहे. एका धाडसी ग्रामीण माफिया ची भूमिका सनी साकारणार आहे. तिने पोस्टर शेअर करताच चाहत्यांनी अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. प्रिया मणी आणि श्रॉफ व्यतिरिक्त सनी लिओन प्रसिद्ध अभिनेत्री सारा अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विवेक कुमार कन्नन दिग्दर्शनात सनी लिओनी एक महत्त्वपूर्ण आणि आकर्षक भूमिका साकारताना दिसणार आहे ती एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून चाहत्यांच्या मनात पुन्हा छाप पाडणार आहे. या चित्रपटात तिला मारेकरी म्हणून दाखवण्यात आले आहे जी एका निर्दयी टोळीची प्रमुख सदस्य आहे, जी कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये माहिर आहे.
[read_also content=”तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना यांचा हॉरर-कॉमेडी ‘अरनमानाई 4’ लवकरच OTT वर रिलीज होणार ! https://www.navarashtra.com/movies/tamannaah-bhatia-and-rashi-khanna-horror-comedy-aranmanai-4-will-soon-release-on-ott-542078.html”]
‘कोटेशन गँग’ व्यतिरिक्त सनीने अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ या चित्रपटात दिसली होती. तिच्याकडे हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवा यांच्यासोबत एक शीर्षकहीन चित्रपट असून निर्मितीमध्ये एक शीर्षकहीन मल्याळम चित्रपट देखील आहे. सनी लिओनी सध्या ‘Splitsvilla X5’ हा शो होस्ट करताना प्रेक्षकांना दिसत आहे. आणि आता OTT वर ‘ग्लॅम फेम’ जज करण्यासाठी सज्ज आहे. कोटेशन गँग या चित्रपटात नेमकी सनीची काय भूमिका आहे आणि तिचे काम पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल ही आशा आहे.