
सनी लिओनीने आतापर्येंत अनेक चित्रपटात काम करून आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच तिचे सगळे चित्रपट हे ब्लॉकब्लस्टर ठरले आहेत. अभिनेत्रीची भूमिका उत्कृष्ट साकारून ती त्याचबरोबर एक उद्योजकसुद्धा आहे. सनी लिओनने हिंदी आणि OTT वरील अनेक शो जज म्हणून केले आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेडे केले आहे. सोशल मीडियावर तिला भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाठ मिळत असतो. याचदरम्यान तिने एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती डीजे वाजवताना दिसत आहे. तसेच तिने कॅप्शनमध्ये, ” आपले टिकट्स बुक करा” असे सुद्धा म्हटले आहे.
अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी तसेच त्यांचे मनोरंजन करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. जागतिक संगीत दिनानिमित्त ही अभिनेत्री डीजे विश्वात पदार्पण करणार आहे. 21 जून रोजी लखनऊमध्ये परफॉर्म करणार असून सनी फिनिक्स पॅलासिओ येथे होणाऱ्या खास एकदिवसीय कार्यक्रमात डीजे वाजवणार आहे. चाहत्यांना सनीला तिच्या खास लूक मध्ये बघायला मिळणार असून सनीची ही बाजू देखील अनुभवयाला मिळणार आहे.
[read_also content=”राशी खन्ना ठरतेय प्रॉमिसिंग, 6 भूमिका पाहायलाच हव्यात https://www.navarashtra.com/movies/rashi-khanna-turns-out-to-be-promising-6-must-see-roles-536702.html”]
तसेच सनीचा अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ती ‘कोटेशन गँग’ मधून तामिळ पदार्पण करणार आहे आणि सध्या ती स्प्लिट्सविला X5 होस्टिंग टेलिव्हिजनवर दिसणार आहे. ती OTT वर ग्लॅम फेम जज करतानाही दिसणार आहे. या प्रकल्पांव्यतिरिक्त, तिच्याकडे प्रभुदेवा आणि हिमेश रेशमियासोबत एक शीर्षकहीन चित्रपट आहे आणि पाइपलाइनमधील अनेक प्रकल्प आहेत जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.