फोटो सौजन्य - सोशल मीडिया
OTT Releases This Week : भारतीय तरुणाईमध्ये OTT ची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एकापेक्षा एक मनोरंजक कंटेंट बघायला मिळणार आहे. नवनवीन आणि लोकप्रिय चित्रपट, देशी आणि विदेशी वेब सिरीज बघायला मिळणार आहेत. आपणा सर्वांना माहितीच आहे की, दर आठवड्याला OTT अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज अनेक भाषांमध्ये रिलीज होत असतात. त्यामुळे जाणून घेऊया बॉलिवूडसह इतर इंडस्ट्रीतही या आठवड्यात क्राईम, ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत.
हे देखील वाचा – बाबो… ‘स्त्री २’च्या नावावर ‘इतके’ रेकॉर्ड्स; पाहा यादी
Thangalaan Poster
थंगलान- Thangalaan
चियान विक्रम स्टारर ‘थंगलान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Lal Salaam Poster
लाल सलाम- Lal Salaam
सुपरस्टार रजनीकांत प्रमुख भूमिका असलेला ‘लाल सलाम’ चित्रपट मोठ्या प्रतिक्षेनंतर ओटीटीवर रिलीज होत आहे. हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी ‘सन एनएक्सटी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Jo Tera Hai Woh Mera Hai Poster
जो तेरा है वो मेरा है- Jo Tera Hai Woh Mera Hai
अभिनेते परेश रावल स्टारर ‘जो तेरा है वो मेरा है’ कॉमेडी सिनेमा २० सप्टेंबर रोजी जिओ सिनेमावर रिलीज झाला आहे. परेश रावलसोबत फैसल मलिक, सोनाली कुलकर्णी आणि सोनाली सेगल यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
द ग्रेट इंडियन कपिल शो – The Great Indian Kapil Sharma Show
कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनची सुरुवात होणार आहे. या सीझनमध्ये अनेक सेलेब्ससह द फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलिवूड वाइव्स या सीरिजची स्टारकास्ट दिसणार आहे. हा शो २१ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता ‘नेटफ्लिक्स’वर स्ट्रीम होणार आहे.