सुष्मिता सेनने तिच्या दोन्ही लेकींना शिकवला आदर मिळवण्याचा योग्य मार्ग, तुमच्याही मुली ठरतील खास द्या 'अशी' शिकवण
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर सुष्मिताने अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सुष्मिता सेनचा आज ४९ वा वाढदिवस आहे. अभिनेत्री ४९ वर्षांची झाली असली तरीही ती अविवाहितच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री सिंगल मदर म्हणून दोन मुलींचे संगोपन करत आहे. असं असलं तरीही ती तिच्या दोन्हीही मुलींचं अगदी उत्तम पद्धतीने पालनपोषण करत असून तिच्या दोन्ही मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
सुष्मिताची पहिली मुलगी रेनी ही २५ वर्षांची आहे, तिला अभिनेत्रीने २००० मध्ये दत्तक घेतलं आहे. तर, दुसरी मुलगी अलिसा ही १५ वर्षांची आहे, तिला अभिनेत्रीने २०१० मध्ये दत्तक घेतलं आहे. सुष्मिता खरंतर बालपणापासून धाडसी आहे. तिच्याप्रमाणेच तिने आपल्या दोन्ही मुलींनाही फार धाडसी बनवलं आहे. सिंगल मदर असलेल्या सुष्मिताने आपल्या दोन्हीही लेकींना आदर खूप चांगल्या पद्धतीने शिकवला आहे. अभिनेत्री म्हणते, आदर मिळवण्यासाठी आपल्या खूप कष्ट करावे लागतात. आपल्यालाही आपल्या मुलींना जर आदरयुक्त सन्मान द्यायचा असेल तर आपणही अभिनेत्रीने सांगितलेल्या दोन गोष्टी आपल्या मुलींना सांगितले आहे.
सुष्मिता म्हणते, आपण कायमच आपल्या मुलींना समोरच्या व्यक्तीला आदर द्यायला शिकवायला हवे. त्यांच्या मते, ज्यांच्यासोबत तुम्ही बोलत असाल किंवा तुम्ही समोरच्या व्यक्तीचे कौतुक करीत असाल, तेव्हा त्यावेळी समोरच्या व्यक्तीसोबत Eyes To Eyes काँटेक्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. यावरून आपण त्या व्यक्तीचा किती सन्मान करतोय, हे समजतं. अभिनेत्रीच्या मते, आदर लहान- लहान हावभावांमध्ये असतो. अगदी लहान विनंत्यांसाठी देखील, Eyes To Eyes काँटेक्ट करणे महत्वाचे आहे. यावरून तुम्ही त्या व्यक्तीला किती महत्त्व देता हे लक्षात येते. हे फक्त शब्दांबद्दल नाही तर तुम्ही ते कसे म्हणता याने देखील फरक पडतो.
सुष्मिता पुढे म्हणाली, समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुमच्या मागे उभ्या असलेल्या वेटरला पाणी आणायला सांगितले. हा एक प्रकारे त्यांचा अपमानच आहे. मागे वळून सर्वात आधी Eyes To Eyes काँटेक्ट करणे महत्वाचे आहे. त्यानंतर त्याला पाणी आणण्यास सांगा. इतरांना आदर देण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. सुष्मिता सेनने सल्ला दिला आहे की, तुम्ही नेहमी इतरांशी जसे वागावे तसे वागावे. फक्त यासाठी, इतरांना आदर देण्याची पद्धत नम्र आणि व्यावहारिक असावी. अभिनेत्रीने आपल्या मुलींना गुंडांना कधीही घाबरू नका असे शिकवले आहे. त्यांनाही तुमची व्याख्या करू देऊ नका. ते तुम्हाला कोणत्याही नावाने हाक मारतील, प्रभावित होऊ नका. ते हाक मारत असणाऱ्या शब्दापेक्षा तुम्ही स्वत:ची प्रतिमा आणखी उत्तम बनवा.