या वर्षाच्या सुरुवातीपासून मनोरंजन सृष्टीत लग्नाचा सिझन सुरू झाला. अनेक सेलेब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले. नुकतचं अभिनेत्री रकुल प्रित सिंगनं जॅकी भगनानी (Rakul Preeet Singh) सोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्यानतंर अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu wedding) विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर आली. इतकचं नव्हे तर तापसीनं इतर सेलेब्रिटींच्या लग्नाप्रमाणे तापसीने थाटमाटात लग्न न करता अत्यंत साधेपणाने लग्न केल्याचंही म्हण्टलं जात होतं. पण यावरुन तापसीकडून अदयापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता तापसीच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Tapsee Pannu Marriage Video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती वधूच्या पोशाखात नाचत एन्ट्री करताना दिसत आहे. मात्र, या व्हिडिओबाबतही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
[read_also content=”आईने मोबाईल देण्यास दिला नकार, संतापलेल्या 12 वर्षाच्या मुलानं घेतला गळफास! https://www.navarashtra.com/world/boy-commits-suicide-after-his-mother-refuse-to-give-mobile-nrps-520612.html”][blurb content=””]
तापसीच्या लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये तापसी वधूच्या पोशाखात दिसत आहे. ति तिच्या एंट्रीदरम्यान नाचताना दिसत आहे, तर मॅथियास स्टेजवर तिची वाट पाहत आहे. या व्हिडिओमध्ये, तापसी पन्नू ब्राइडल गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
मात्र, तापसीच्या बाजूने कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही, ना कोणताही फोटो किंवा कोणताही व्हिडिओ. आपण विवाहित असल्याचे तिनं अद्याप सांगितलेलं नाही. मात्र, ही बातमी बऱ्याच दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्समध्ये येत आहे.
अखेर, तापसी पन्नूचा शूटमधील वेडिंग लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. हा तिचा पहिला लग्नाचा व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावर समोर आला आहे, जो स्वत: अभिनेत्रीने शेअर केलेला नसून तो लीक झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तापसी आणि मथियास बॉयने 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाला फक्त त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.