सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा सिझन सुरू आहे. नुकतंच अभिनेत्री रकुल प्रीत सिंगनं जॅकी भगनानी सोबत लग्नगाठ बांधली. आता बॅालिवूडमधील आणखी एक अभिनेत्री लग्नगाठ बांधायला तयार आहे. अभिनेत्री तापसी पन्नू लवककच लग्नाच्या बेडीत (Taapsee Pannu Wedding) अडकणार आहे. रिपोर्ट्स नुसार, तापसी लवकरच तिचा बॉयफ्रेंड आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बोसोबत (Mathias Boe) लग्न करणार आहे. प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, कतरिना कैफ आणि कियारा अडवाणी यांच्याप्रमाणे तापसी आणि मथियासही राजस्थानमध्ये लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचं बोललं जात आहे.
[read_also content=”सिद्धू मूसवालाच्या घरी पुन्हा हलणार पाळणा, आई-वडील पुन्हा होणार पालक! https://www.navarashtra.com/movies/sidhu-moosewala-mother-is-pregnant-his-mother-and-father-will-become-parent-again-nrps-510951.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, इतर सेलिब्रिटीप्रमाणे तापसीच्या लग्नात कलाकार मंडळीचा गोतावळा नाही असणार. तापसी तिच्या लग्नात कोणत्याही बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रीला आमंत्रित करणार नाही आहे. तिचं कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत उदयपूर ती मॅथियाससोबत लग्न करणार. सूत्रानुसार, दोघांचे लग्न शीख आणि ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजांनुसार होणार आहे. तापसीच्या लग्नानाच्या बातमी समोर आली आहे मात्र, तीच्या बाजूने किंवा मथियासच्या बाजूने आतापर्यांत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
तापसी आणि मथियास गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तापसीचं वय ३६ आहे. तर मथियास 43 वर्षांचा आहे. मॅथियास बोए हा डॅनिश बॅडमिंटनपटू आहे. तो दोन वेळा युरोपियन चॅम्पियन आणि ऑलिम्पिक पदक विजेता आहे. मात्र, मॅथियासने चार वर्षांपूर्वी बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली.
जानेवारी 2024 मध्ये एका पॉडकास्टमध्ये तापसीने सांगितले होते की तिची आणि मॅथियासची भेट तिच्या बॉलिवूड डेब्यूदरम्यान झाली होती आणि तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. आपल्या नात्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली होती की, जर तुमचे नाते चांगले असेल तर तुम्हाला कोणतेही ओझे वाटत नाही.