फोटो सौजन्य - Social Media
आपल्या पतीसोबत करवाचौथ साजरा करण्यासाठी काही बी टाऊन गर्ल्स दिल्लीला रवाना झाल्या आहेत. दिल्ली विमानतळावर या अभिनेत्रींना पाहण्यात आले आहे. किआरा अडवाणी, परिणीती चोप्रा तसेच कृती खरबंदा आपल्या नव्या लूकमध्ये दिल्ली विमानतळावर दाखल होतानाची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांची करवाचौथची पोस्ट पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. उत्तर भारतात करवाचौथच्या या सणाला फार महत्व आहे. महाराष्ट्रमध्ये पती पत्नीच्या प्रेमाचा सण म्हणजे वटपौर्णिमेला पाहिले जाते. तसेच उत्तर भारतात पती पत्नीच्या प्रेमाच्या पवित्र नात्यासाठी करवाचौथ हा सण आहे. वैवाहिक प्रेम, भक्ती साजरी करणारा हा उत्सव या ग्लॅमरस अभिनेत्रींच्या उपस्थितीने आणखीनच खास बनला होता.
हे देखील वाचा : बॉलीवूडमध्येही दिसतेय करवाचौथची परंपरा; खास पत्नीसाठी धरला ‘या’ अभिनेत्यांनी उपवास
अभिनेत्री कियारा अडवाणी, तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत करवा चौथ साजरी करण्यासाठी स्लीक पँट सूटमध्ये शक्तिशाली बॉस लेडी व्हिब स्टाईलमध्ये पोहोचली. तिची कमांडिंग उपस्थिती आणि निर्दोष फॅशन सेन्स पूर्ण प्रदर्शनात होती, जे तिला एक खरी शैली आयकॉन म्हणून प्रदर्शित करते.
बी टाऊनमध्ये करवाचौथचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. क्रिकेटर विराट कोहलीने तिच्या पत्नीसाठी म्हणजेच अभिनेत्री अनुष्कासाठी खास उपवास धरला आहे. विराटाचे नव्हे तर विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा तसेच राघव चड्ढाने त्यांच्या पत्नींसाठी खास उपवास धरला आहे. त्यांच्या या कृतीने त्यांच्या पत्नीप्रेमाबद्दल चांगला संदेश समाजात गेला आहे.