फोटो सौजन्य - Social Media
बी टाऊनचा चॉकलेट बॉय म्ह्णून ओळख असणारा शाहिद कपूर आता व्हायलेन्ट करण्याच्या मूड मध्ये आहे. नुकतेच शाहिद कपूरने त्याच्या इंस्टाग्राम हॅन्डलमार्फत त्याच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. पुन्हा एकदा शाहिद कपूर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शाहिदने त्याचा नवीन आगामी सिनेमा देवाचा फर्स्ट लुक इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात शाहिद हातात पिस्तूल घेऊन उभा आहे. येत्या सिनेम्यात शाहिद पोलिसाचे पात्र निभावणार आहे. त्याच्या या लूकमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
शाहिदने त्याच्या इन्स्टा हँडलवर ‘देवा’ चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला असून त्याखाली कॅप्शनमध्ये चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख नमूद केली आहे. चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ ला भारतात सर्वत्र सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रदर्शित होणार असल्याने शाहिदने कॅप्शनमध्ये ‘गेट रेडी फॉर व्हायलेन्ट व्हॅलेंटाइन डे’ अशी ओळ लिहली आहे.
कॉमेंट्समध्ये लोकांचा उत्साह जाणवून येत आहे. एका नेटकऱ्याने ‘आम्ही चित्रपट पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही किंवा आम्हाला वाट पाहायचीच नाही आहे’, अशा शब्दात उत्सुकता प्रकट केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी शाहिदच्या पोलिसांच्या लुकवरून शाहिदचे कौतुक केले आहे. एक नेटकरी म्हणत आहे कि’ “शाहिदला या पोलिसांच्या रूपात अभिनय करताना पाहणे खूप मस्त अनुभव असेल.”
शाहिदचा पोस्टरमधील भन्नाट लुक
शाहिदने इन्स्टा पोस्टने त्याच्या नवीन चित्रपट देवाचे फर्स्ट लुक शेअर केले आहे. शाहिदचा नवा लुक मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी कॉमेंट्समध्ये नेटकरी अतिउत्सुक आहेत. शाहिद कपूर देवामध्ये पोलिसांच्या भूमिकेत असणार आहे. पोस्टरमध्ये शाहिदने हातात पिस्तूल घेत पोज दिला आहे. यात शाहिदने खाकी पंत घातली आहे तसेच पोलीस लिहून असलेले एक बुलेट प्रूफ जाकीट त्याने घातले आहे. डोळ्यावर चष्मा घालत हा डॅशिंग लुक सिनेमाचा फर्स्ट लुक ठरला आहे.