
फोटो सौजन्य - Social Media
‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला, पण त्यासोबतच या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यानेही रिलीज होताच प्रचंड चर्चा निर्माण केली होती. तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नसून, आजही ते बॉलीवूडमधील सर्वात हॉट आणि आयकॉनिक ट्रॅक्सपैकी एक मानले जाते. काही गाणी केवळ त्या क्षणापुरती लोकप्रिय राहत नाहीत, तर काळाच्या पुढे जात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात ‘बेशरम रंग’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. यशराज फिल्म्स म्युझिक अंतर्गत रिलीज झालेलं हे गाणं ‘पठाण’च्या अल्बममधील पहिलं सिंगल होतं. या गाण्यात दीपिका पादुकोण तिच्या आतापर्यंतच्या सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अवतारात दिसली. स्क्रीनवर तिचा आत्मविश्वास, सौंदर्य आणि स्टारडम एकत्र दिसत होतं. त्यामुळेच ‘बेशरम रंग’ रिलीज होताच तो केवळ एक गाणं न राहता एक मोठा पॉप-कल्चर मोमेंट ठरला.
शानदार लोकेशन्स, स्टायलिश सिनेमॅटोग्राफी आणि ऊर्जावान म्युझिकमुळे हे गाणं क्षणार्धात पार्टी अँथम बनलं. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची केमिस्ट्री हा या गाण्याचा आणखी एक मोठा प्लस पॉइंट ठरला. दोघांनाही एकत्र पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी नेहमीच खास असतं, आणि ‘बेशरम रंग’मध्ये ही जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.
हे गाणं स्पेनमधील मल्लोर्का, कॅडिझ आणि जेरेझसारख्या सुंदर लोकेशन्सवर चित्रित करण्यात आलं आहे. समुद्रकिनाऱ्यावर दीपिकाचे स्टायलिश आणि दमदार लुक्स गाण्याला वेगळीच उंची देतात. तिच्या बोल्ड पण अतिशय ग्रेसफुल डान्स मूव्ह्सनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या गाण्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चंट यांनी केली असून, दीपिकाचा आता आयकॉनिक ठरलेला हुक स्टेप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
‘बेशरम रंग’ला संगीत दिलं आहे प्रसिद्ध संगीतकार जोडी विशाल-शेखर यांनी. गीतकार कुमार यांनी लिहिलेल्या शब्दांना शिल्पा राव आणि कारालिसा मॉन्टेरो यांच्या आवाजाने खास रंगत दिली. बॅकिंग वोकल्समध्ये विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांचा सहभाग होता. गाण्यातील मॉडर्न साउंडस्केप आणि स्पॅनिश व्हर्सेसमुळे या ट्रॅकला ग्लोबल अपील मिळालं. एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘बेशरम रंग’ हे त्या वर्षातील सर्वात वेगाने 100 मिलियन व्ह्यूज पार करणारे बॉलीवूड गाणे ठरले. तीन वर्षांनंतरही हे गाणं प्लेलिस्ट्सवर तितक्याच दिमाखात राज्य करत आहे. दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या जोडीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, त्यांची केमिस्ट्री कायमच सिनेमॅटिक जादू निर्माण करते. ‘बेशरम रंग’ आजही तितकंच फ्रेश, फायर आणि मोहक वाटतं—त्याच्या टाइमलेस अपीलचा हा खरा पुरावा आहे.