मुंबईत गोळीबाराचा थरार! अभिनेता केआरके पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडल? (photo Credit- X)
#BREAKING Mumbai Police have arrested actor Kaamal R. Khan in connection with the Oshiwara firing case: Mumbai Police pic.twitter.com/dVNRvGYFDX — IANS (@ians_india) January 24, 2026
१८ जानेवारी रोजी अंधेरीतील नालंदा सोसायटीत गोळीबाराची घटना घडली होती. या इमारतीतील दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर प्रत्येकी एक अशा दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. येथे लेखक-दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा (४५) राहतात. येथे स्ट्रगलिंग मॉडेल प्रतिक बैद (२९) राहतो. सुदैवाने, या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, मात्र फ्लॅटच्या भिंतींवर गोळ्यांचे निशाण आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
साईबाबांच्या पालखीतील श्रद्धेचा प्रवास उलगडणारा ‘पालखी’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न!
सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेज नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. मात्र, फॉरेन्सिक टीमने केलेल्या तांत्रिक तपासणीत या गोळ्या केआरकेच्या बंगल्यातून झाडल्या गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी केआरकेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. केआरकेने कबूल केले की त्याने त्याच्या परवानाधारक बंदुकीतून गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, कोणालाही इजा करण्याचा त्याचा हेतू नव्हता, असा दावा त्याने केला आहे. पोलिसांनी केआरकेची बंदूक जप्त केली असून, आज त्याला औपचारिक अटक होण्याची दाट शक्यता आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १८ अधिकाऱ्यांच्या पथकाने आणि गुन्हे शाखेच्या मदतीने या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावला. परवानाधारक शस्त्राचा गैरवापर केल्याप्रकरणी केआरकेवर कठोर कारवाई केली जाण्याची चिन्हे आहेत.
१ जानेवारी १९७५ रोजी उत्तर प्रदेशात जन्मलेला केआरके त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी आणि सेलिब्रिटींवरील वैयक्तिक हल्ल्यांसाठी ओळखला जातो. ‘देशद्रोही’ चित्रपट आणि ‘बिग बॉस’ सीझन ३ मुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता. सध्या तो यूट्यूब आणि सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक म्हणून सक्रिय असून अनेकदा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे.






