बिग बॉसच्या या स्टार अभिनेत्याने रोहित शेट्टीच्या प्रसिद्ध शोला केले रिजेक्ट! स्वतः मुलाखतीमध्ये केले स्पष्ट (फोटो सौजन्य - pinterest)
कलर्स टेलिव्हिजनवरचा स्टंट रिऍलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ खूप लोकप्रिय आहे. बिग बॉसनंतर हा चॅनेलचा सर्वात लोकप्रिय शो आहे. रोहित शेट्टी या शोचे होस्ट आहेत. रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित शोच्या १५ व्या सीझनसाठी सगळे प्रेक्षक वाट बघत आहेत. यासाठी निर्मात्यांनी अनेक प्रसिद्ध टीव्ही स्टार्सशी संपर्क साधला आहे. एका अभिनेत्याने हा शो नाकारल्याची बातमी आहे.
Kangana Ranaut Birthday : ३९ वर्षीय कंगना रणौत अजूनही का आहे सिंगल, स्वत:च केला खुलासा
रोहित शेट्टीच्या स्टंट रिऍलिटी शो सुरु होण्याची आतुरतेने वाट टीव्ही लव्हर्स पाहत आहेत. १५व्या सीजनच्या खतरो के खिलाडीचा लेवल वाढणार आहे. कलर्स टीव्हीच्या या पॉप्युलर शोसाठी छोट्या पडद्यावर अनेक प्रसिद्ध स्टार्सला संधी दिली जाते या शोसाठी त्यांना मानधन देखील चांगले दिले जाते. मात्र यामधील काही लोकांनी ऑफर नाकारल्याची माहिती समोर आली आहे. एक नवीन अपडेट अशी आहे की एक प्रसिद्ध अभिनेत्याने खतरो के खिलाडी १५ला रिजेक्ट केले आहे.
स्टंट रिऍलिटी शो खतरो के खिलाडीला रोहित शेट्टी होस्ट करत आहे. कठीण स्टंट टास्क करण्यासाठी प्रत्येक सीजन नवीन स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभागी होतात. मागील सीजनची ट्रॉफी टीव्ही ऍक्टर करणवीर मेहराने जिंकली होती. आता १५व्या सीजनचा ऑफर एका अभिनेत्याने रिजेक्ट केला आहे. जो कलर्स टीव्हीच्या सिरीयल आणि बिग बॉसमध्ये दिसला आहे.
शो नाकारल्याचे सांगितले कारण
अंकित गुप्ताने खतरो के खिलाडी १५ च्या ऑफर बाबत बॉलिवूड बबलला इंटरव्यू मुलाखत देतांना सांगितले की रोहित शेट्टीच्या शोसाठी निर्मात्यांनी तुम्हाला संपर्क साधला हे तुम्ही मान्य केले. या वर्षीच्या ‘खतरों के खिलाडी’साठी तो तयार नसल्याचे अभिनेत्याने सांगितले. ‘मला शो ऑफर झाला होता आणि टीम सोबत माझं बोलणं झालं होत. माझ्यासोबत हे पहिल्यांदाच घडलंय, मला असं वाटते की मला कोणतेच काम नाही केले पाहिजे. आता मला माझ्यासाठी २ ते ३ महिने वेळ पाहिजे. अशा परिस्थितीत, मी या शोचा भाग होण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी नाही’.
बिग बॉससाठी थोडा वेळ घ्यायला पाहिजे होता
अभिनेता अंकित गुप्ताने सलमान खानचा शो बिग बॉस मध्ये जाण्या संदर्भात बोलणे केले की या शो साठी देखील त्यांना थोडा वेळ घ्याला पाहिजे होता. बिग बॉस आणि खतरों के खिलाडी हे वन टाइम शो आहे ज्यात सर्वोत्तम देणं गरजेचं असत.
ब्रेकअपच्या चर्चा
टीव्ही अभिनेता अंकित गुप्ताच्या ब्रेकअपच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अंकित गुप्ता बिग बॉस १६ मध्ये दिसला होता. बिग बॉस १६ मध्ये दिसलेला अंकित त्याच सीझनमध्ये दिसलेली प्रियंका चहर चौधरी हिच्याशी नाव जोडले गेले होते. दोघांनीही आधी उड़ारियां सीरियलमध्ये काम केलं आहे. बिग बॉस मध्ये दोघांनीही एक- दुसऱ्याला खूप चांगले मित्र असल्याचा सांगितले होते. शो संपल्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र आता चर्चा आहे की दोघांचा ब्रेकअप झाला आहे.
अभिनेत्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयचे मोठे विधान!