Kangana Ranaut Birthday
बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आज तिचा वाढदिवस आहे. अवघ्या इंडस्ट्रीसह आपल्या चाहत्यांमध्ये अभिनयासाठी आणि प्रत्येक मुद्द्यावर बेधडक मत व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाचा आज ३९वा वाढदिवस आहे. कंगनाने फार कमी वयात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कंगनाला चित्रपटांमध्ये काम मिळाले आणि तिने स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या कंगनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या करियरबद्दल आणि तिच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेऊया…
अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका आणि खासदार म्हणून कंगना आपली भूमिका लिलया पार पाडताना दिसत आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये कंगनाने मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. या निवडणूकीमध्ये अभिनेत्रीला घवघवीत यश मिळाले होते. आता कंगना एक प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच खासदार देखील आहे. कायमच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या कंगनाचा एक प्रसिद्ध अभिनेत्री होण्याचा प्रवास इतका काही सोपा नव्हता. कंगनाने तिच्या आजवरच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनामनात घर केलं आहे. ‘फॅशन’ असो, ‘क्विन’ असो की, ‘तनु वेड्स मनू’ कंगनाने नेहमीच तिच्या भारदस्त अभिनयाने सिनेमे गाजवले आहेत.
‘श्रीलंकेची राणी, जिच्यावर दुनिया दिवानी…’ Jacqueliene Fernandezचा Hot अंदाज
कंगना रनौतचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील भंबालामध्ये झाला आहे. मंडी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या कंगनाचे वडील व्यवासायिक आणि आई शिक्षिका आहे. कंगनाने डॉक्टर व्हावं, अशी तिच्या आई- वडिलांची इच्छा होती. पण कंगनाला शिक्षणात रस नव्हता. इतकंच नव्हे तर बारावीच्या परीक्षेत कंगना नापास झाली होती. तिला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिला अभिनेत्री व्हायचं होतं. कंगनाला कळत होतं की, अभिनेत्री होण्यासाठी आपल्याला घरातून म्हणावा तसा पाठिंबा मिळत नाहीये. तिचा निर्णय घरातले सदस्य ही मान्य करत नव्हते. त्यामुळे अभिनेत्री होण्यासाठी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी कंगनाने घर सोडले आणि मुंबई गाठले.
सुरुवातीच्या काळात, कंगनाने काही दिवस मॉडेलिंगच्या प्रोजेक्टमध्ये काम केले आणि नंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.. कंगनाकडे फिल्मी पार्श्वभूमी नसल्यामुळे तिला चित्रपट मिळणे सोपे नव्हते. यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले. लहान वयात इंडस्ट्रीत एकटे टिकून राहणे सोपे नव्हते. पण तरीही कंगना डगमगली नाही. कंगना राणौतला वयाच्या १७ व्या वर्षी पहिला चित्रपट मिळाला. ‘आय लव्ह यू बॉस’ असं तिच्या पहिल्या चित्रपटाचं नाव होता. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन पहलाज निलानी यांनी केले होते. कंगनाला तो चित्रपट २००४ साली मिळाला होता. पण तिने ह्या चित्रपटामध्ये काम केले नाही. काही कारणास्तव चित्रपट अर्धवट सोडून कंगनाने महेश भट्ट यांच्या ‘गँगस्टर’साठी काम करायला सुरुवात केली. मग तिच्या सिनेकरियरमधील ‘गँगस्टर’ हा चित्रपट पहिला चित्रपट ठरला. कंगनाचा ‘गँगस्टर’ हा चित्रपट २००६ मध्ये रिलीज झाला होता.
३९ वर्षीय कंगनाने एकदा रजत शर्माच्या शोमध्ये ‘ती अजूनही सिंगल का आहे ?’ या प्रश्नाचं मोकळेपणाने उत्तर दिले. कंगना राणौतचे नाव शेखर सुमनचा मुलगा अध्यायन सुमन आणि हृतिक रोशनशी जोडले गेले होते. पण तिचे त्या दोघांसोबतही ब्रेकअप झालेला आहे. कंगनाने अजून लग्न न करण्याचे कारणही सांगितले. तिने एक मजेदार किस्सा सांगितला. ती म्हणाली की, “एकदा मला पाहण्यासाठी माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे आई- वडील भेटायला आले होते. त्यांच्या समोरंच मला पोलिसांचं समन्स आलं होतं. त्यांनी मला आलेले पोलिसांचे समन्स पाहून ते परत गेले. माझ्याविरुद्ध इतक्या लोकांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे की, मला नेहमीच कोर्टातून समन्स येत राहतात. त्यांच्यासमोरंच ते पत्र मला आलं होतं, ते पाहून त्यांनी थेट घरचा रस्ता गाठला. ते एका केस संदर्भात पाठवलेले समन्स होते. माझे होणारे सासू-सासरे त्यामुळे इतके घाबरले होते की त्यांनी पुन्हा माझ्याशी संपर्कच साधला नाही.”