
ti parat aaliye latest update
‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliye)असं म्हणत आख्ख्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवणारी ही झी मराठीवरील(Zee Marathi) मालिका सुरुवाती पासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा पाहता या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. (Ti Parat Aaliye Serial Update) मालिकेचं रहस्यमय कथानक आणि खिळवून ठेवणारे प्रसंग हे उल्लेखनीय असून, प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभिनय हा एकापेक्षा एक होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
या मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीच, पण त्याचसोबत मालिकेच्या कथानकाला पुरेपूर न्याय देखील दिला. प्रेक्षकांच्या या आवडत्या मालिकेनं नुकताच १०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे. त्याचसोबत मालिका शेवटच्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच ‘ती परत आलीये’(Ti Parat Aaliye) म्हणजे ‘ती’ नक्की कोण आहे? या प्रश्नानं प्रेक्षकांना भंडावून सोडलं. आता लवकरच मालिकेत ‘ती’चा पर्दाफाश होणार असून, या सगळ्यामागे नक्की कोण आहे हे प्रेक्षकांना कळेल. एकामागे एक चालू असलेल्या हत्येच्या मालिकेमागे नक्की ती आहे तो याच रहस्य उलगडणार असून, संपूर्ण महाराष्ट्राला ‘ती’ कोण आहे? याच उत्तर मिळणार आहे. त्यामुळे हे रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा अजूनच वाढली आहे.