फोटो सौजन्य - Social Media
बॉलीवूड असो किंवा हॉलीवूड, सेलिब्रिटींची डेटिंग लाइफ ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या हॉलीवूडचा सुप्रसिद्ध अॅक्शन हिरो टॉम क्रूज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण, सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तो आपल्या पेक्षा २६ वर्षांनी लहान अभिनेत्री एना डे आर्मससोबत हातात हात घालून दिसत आहे. हे फोटो पाहून दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अद्याप टॉम किंवा एना यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.
टॉम क्रूजच्या आधीच्या तीन विवाहांचा शेवट अपयशी ठरला होता. आता त्याचे नाव ३७ वर्षीय क्यूबन अमेरिकन अभिनेत्री एना डे आर्मससोबत जोडले जात आहे. एना ही तिच्या ताकदीच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठीही ओळखली जाते. तिचे स्टायलिश गाउनपासून कॅज्युअल पोशाखांपर्यंतचे सर्व लुक्स नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनतात.
अलीकडे एना चे काही फोटो व्हायरल झालेत, ज्यामध्ये ती ब्लॅक थाय-हाय स्लिट ड्रेसमध्ये अतिशय एलिगंट आणि सिझलिंग दिसत होती. फुल स्लीव्ज आणि हाय नेक डिझाइन असलेल्या या आउटफिटमध्ये तिने कमाल लुक दिला होता. दुसऱ्या एका लुकमध्ये ती स्ट्रॅपी स्लीव्स आणि प्लंजिंग नेक असलेल्या टेक्सचर्ड डिझाइन गाउनमध्ये दिसून आली. फ्लोरल हेमलाइन आणि ट्रेलने तिच्या लुकला अजून उठाव दिला.
तिचा सिल्व्हर शिमरी हॉल्टर नेक गाउन लुकसुद्धा तितकाच आकर्षक होता. गाउनच्या अपर भागात कॉर्सेट स्टाईल आणि क्रिस्टल वर्कने तिचा सौंदर्य खुलवले. तसेच, पांढऱ्या मिनी स्कर्टसह लेमन यलो ब्रालेट घालून समुद्रकिनारी दिलेले ग्लॅमरस पोझेस सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. एना प्रत्येक लुक आत्मविश्वासाने कॅरी करते. ब्लॅक कॉर्सेट टॉपसोबत मिनी स्कर्ट आणि ब्लेझर, किंवा ब्लॅक स्पॅगेटी क्रॉप टॉपसोबत व्हाईट स्कर्ट! प्रत्येक पोशाखात तिचा बोल्ड आणि स्टायलिश अंदाज स्पष्ट दिसतो. तिने केलेली अक्सेसरीजची निवडही तिच्या लुकला परिपूर्ण बनवते. सध्या टॉम आणि एना यांच्या या जवळीकांमुळे अफवा अधिकच वाढल्या असून, दोघांची जोडी पाहून चाहतेही प्रचंड उत्साहित आहेत.