फोटो सौजन्य - Instagram
दिनेश विजन यांच्या मॅडॉक चित्रपट ‘परम सुंदरी’ची नवीन प्रदर्शन तारीख आता जाहीर झाली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर अभिनीत हा चित्रपट आता २९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे. यापूर्वी हा चित्रपट २५ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे ज्यामध्ये सिद्धार्थ आणि जान्हवी दिसत आहेत. तसेच चाहते या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
चित्रपटातील ‘परदेसिया’ गाणं नुकतेच रिलीज
निर्मात्यांनी चित्रपटातील ‘परदेसिया’ हे गाणे देखील प्रदर्शित केले आहे. या गाण्यात सिद्धार्थ आणि जान्हवीमध्ये जबरदस्त केमिस्ट्री दिसून येते. दोन्ही पात्रे प्रेमात बुडालेली आहेत आणि एकमेकांवर ते प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच सोनू निगम यांच्या आवाजातील या ‘परदेसिया’ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २००० मध्ये पुन्हा परतलो आहोत असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
‘परम सुंदरी’ चित्रपटातील स्टारकास्ट
सध्या प्रेमकथांवर आधारित चित्रपट बॉलीवूडमध्ये वर्चस्व गाजवत आहेत. अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा ‘सैय्यारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, प्रेमकथांवर आधारित चित्रपटांना चित्रपटसृष्टीत एक नवीन जीवन मिळाल्यासारखे वाटते आहे. या मालिकेत, प्रथम ‘धडक २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी ही जोडी दिसणार आहे. त्यानंतर महिन्याच्या अखेरीस सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘परम सुंदरी’ हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘द डार्क नाईट’ फेम अभिनेता Alon Aboutboul यांचे निधन, मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
चित्रपटाची कथा कशी असेल?
‘परम सुंदरी’ मध्ये, सिद्धार्थ दिल्लीतील एका श्रीमंत किंवा मोठ्या उद्योगपती परमची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे, जान्हवी एका मुलीची (सुंदरी) भूमिका साकारत आहे जी केरळची आहे आणि व्यवसायाने एक कलाकार आहे, जी तिच्या परंपरा आणि तत्त्वांवर ठाम आहे. या चित्रपटात पूर्णपणे भिन्न स्वभावाचे दोन लोक एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात हे दाखवले जाईल. हा चित्रपट त्यांच्या प्रेमकथेवर आधारित असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा करत आहेत, ज्यांनी यापूर्वी २०२२ मध्ये ‘दसवी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.