'या' १० बॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती
२०२४ हे वर्ष हिंदी सिनेसृष्टीसाठी खूपच खास ठरले आहे. या वर्षी अनेक मोठ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करून प्रेक्षकांचे चित्रपटांवरील प्रेम अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले.. रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेले चित्रपट आता OTT वर देखील उपलब्ध झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला २०२४ च्या टॉप १० सर्वाधिक IMDb रेटेड बॉलिवूड चित्रपटांची नावे सांगणार आहोत. तुम्ही हे चित्रपट अजून पाहिले नसतील तर २०२४ संपण्यापूर्वीही तुम्ही ते चित्रपट OTT वर पाहू शकता.
सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान क्रेझ, युट्यूबवर टीझरचा Top 10 मध्ये समावेश
२०२४ च्या टॉप १० सर्वाधिक IMDb रेटेड बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ चित्रपटाचा समावेश होतो. हा चित्रपट मार्च २०२४ मध्ये रिलीज झाला होता. या कॉमेडी ड्रामा चित्रपटाने जगभरात २५. २६ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्हाला ‘नेटफ्लिक्स’वर पाहायला मिळेल. या चित्रपटाला आयएमडीबीच्या रेटिंगमध्ये ८.४ इतके रेटिंग्स मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाचा समावेश होतो. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या ‘मैदान’ चित्रपटाला ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळाला. अजय देवगणच्या ह्या चित्रपटाला IMDb कडून ८ इतके रेटिंग्स मिळाले आहेत. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’ वर पाहू शकता.
संम्युक्ता मेननचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत करणार स्क्रिन शेअर
कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट जून २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या फिल्मी करियरमधला सर्वात मोठा चित्रपट मानला जातो. या चित्रपटाने जगभरात ८७ कोटींचीच कमाई केली होती. चित्रपटाला IMDb कडून ७.९ इतके रेटिंग्स मिळाले आहेत. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’ वर पाहू शकता. इम्तियाज अलीचा ‘अमर सिंह चमकिला’ चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाला IMDb कडून ७.८ इतके रेटिंग्स मिळाले आहेत. हा चित्रपट तुम्ही ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता.
२०२४ मध्ये रिलीज झालेला ‘किल’ हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट मानला जातो. चित्रपटाला IMDb कडून ७.६ इतके रेटिंग्स मिळाले आहेत. हा चित्रपट तुम्ही ‘हॉटस्टार’वर पाहू शकता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४१ कोटींची कमाई केली. राजकुमार राव स्टारर ‘श्रीकांत’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६३ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाला IMDb कडून ७.४ इतके रेटिंग्स मिळाले आहेत. हा चित्रपट तुम्ही ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता. अभिषेक बच्चनचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटाला IMDb कडून ७.३ इतके रेटिंग्स आहेत. हा चित्रपट अद्याप OTT वर रिलीज झालेला नसून चित्रपटाचे ओटीटी राईट्स ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’ कडे आहेत.
विक्रांत मेस्सी स्टारर ‘सेक्टर ३६’ चित्रपटालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. या क्राईम ड्रामा चित्रपटाला IMDb कडून ७.१ इतके रेटिंग्स मिळाले आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना ‘नेटफ्लिक्स’वर पाहायला मिळेल. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी अवघ्या इंडस्ट्रीचे लक्ष स्वत:कडे वेधले आहे. चित्रपटाला IMDb कडून ७ इतके रेटिंग्स मिळाले आहेत. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’ वर पाहू शकता. प्रभास आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपट याच वर्षी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला IMDb कडून ७ इतके रेटिंग्स मिळाले आहेत. तुम्ही हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’वर पाहू शकता.