सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान क्रेझ, युट्यूबवर टीझरचा Top 10 मध्ये समावेश
‘गदर २’च्या घवघवीत यशानंतर अभिनेता सनी देओल आपल्या अपकमिंग चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. सनी देओल एका वर्षानंतरच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी देओल स्टारर ‘जाट’ (Jaat) चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ‘पुष्पा २’चित्रपट ज्या दिवशी थिएटरमध्ये रिलीज झाला. त्याच दिवशी सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला. चित्रपटाचा टीझर फक्त सोशल मीडियावरच नाही तर, थिएटरमध्ये देखील चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. प्रदर्शनाच्या दिवशी १२, ५०० स्क्रीन्सवर चित्रपटाचा टीझर रिलीज केला.
संम्युक्ता मेननचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत करणार स्क्रिन शेअर
अभिनेता सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट मास ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपटाची निर्मिती मैथ्री मुव्ही मेकर्सने केलेली आहे. ‘पुष्पा २’ आणि ‘जाट’ या दोन्हीही चित्रपटांचे एकच निर्माते आहेत. तर ‘जाट’चे दिग्दर्शन गोपिचंद मालिनेनी यांनी केले आहे. जेव्हा या चित्रपटाचा टीझर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांची एनर्जी अफलातून होती. सनी देओलच्या दमदार अभिनयाने आणि थरारक ॲक्शन सीन्सला प्रेक्षकांनी जोरदार शिट्ट्या आणि टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचा उत्साह आणि प्रतिसाद दाखवला. टीझरने चाहत्यांना खुर्चीला खिळवून ठेवले, यावरुन हे पुन्हा सिद्ध झाले की सनी देओल भारतीय सिनेसृष्टीतील खरा ॲक्शन हिरो आहे.
रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंह, सैयामी खेर आणि रेजिना कैसंड्रा यांसारख्या प्रतिभावान कलाकारांच्या जबरदस्त अभिनयासोबतच हा सिनेमा प्रेक्षकांना एका दमदार आणि रोमांचक कथानकाचा अनुभव देणार आहे. ‘जाट’ या सिनेमाची संगीताची जबाबदारी थमन एस यांनी घेतली आहे, तर सिनेमॅटोग्राफी ऋषी पंजाबी यांनी सांभाळली आहे. नवीन नूली यांनी एडिटींगचे काम अतिशय चोख केले असून, अविनाश कोला यांनी प्रोडक्शन डिझाइनची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. ऍक्शन सीनसाठी अनल अरासु, राम-लक्ष्मण आणि वेंकट यांच्या टीमने उत्कृष्ट स्टंट आणि रोमांचक ऍक्शन सिक्वेन्स तयार केले आहेत, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतील.
सध्या सर्वत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ‘जाट’ चित्रपटाच्या टीझरची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या युट्यूबवर चित्रपटाचा टीझर टॉप ९ मध्ये असल्याचं पाहायला मिळेल. अद्याप चित्रपटाची रिलीज जाहीर करण्यात आलेली नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार, सन्नी देओलचा ‘जाट’ चित्रपट येत्या एप्रिल २०२५ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. सनी देओल ‘जाट’ या ॲक्शनपटाव्यतिरिक्त प्रीती झिंटासोबत ‘लाहोर १९४७’ आणि वरुण धवनसोबत ‘बॉर्डर २’ सारख्या चित्रपटांत दिसणार आहे.