Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमाची परिभाषा मांडणार ‘तुझा झालो गं’ गाणं, प्रेमाची व्याख्या गाण्यातून कळणार

मैत्रीची व्याख्या निराळी असलं तर त्याला प्रेमाचे बंध आले की, ते नातं एका वेगळ्याच दिशेने उलगडताना दिसतं. अशाच मैत्रीची, प्रेमाची अनोखी रंजक कथा 'झालो तुझा गं' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 20, 2024 | 01:03 PM
प्रेमाची परिभाषा मांडणार 'तुझा झालो गं' गाणं, प्रेमाची व्याख्या गाण्यातून कळणार

प्रेमाची परिभाषा मांडणार 'तुझा झालो गं' गाणं, प्रेमाची व्याख्या गाण्यातून कळणार

Follow Us
Close
Follow Us:

‘मितवा’ म्हणजेच ‘मित्र’, ‘तत्वज्ञानी’ आणि ‘वाटाड्या’. या मितवा शब्दाची व्याख्याच निराळी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा मितवा असतो जो वेळोवेळी आपल्याला मदतीचा हात पुढे करतो इतकंच नव्हे तर नकळतपणे ही तो बरीचशी मदत आपल्याला करताना दिसतो. मात्र एका उंचीवर गेल्यानंतर त्या मित्राला विसरायचं नसतं याचं भान प्रत्येकाला असणंही तितकंच आवश्यक आहे. बरेचदा या मैत्रीचं रुपांतर प्रेमातही होताना पाहायला मिळतं. मैत्रीची व्याख्या ही निराळी असली तरी त्याला प्रेमाचे बंध आले की, ते नातं एका वेगळ्याच दिशेने उलगडताना दिसतं. अशाच मैत्रीची, प्रेमाची अशी अनोखी अशी रंजक कथा एका नव्या कोऱ्या ‘झालो तुझा गं’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटातलं शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातलं ‘ऋतु वसंत’ गाणं प्रदर्शित

रोमँटिक गाण्यांची सध्या चलती असताना एका आशयघन कथेला अनुसरून हे प्रेम गीत साऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतंय. मनाला भिडणारी अशी अप्रतिम प्रेमकथा या गाण्यातून प्रत्येक प्रेमी युगुलाचा भाग होण्यास सज्ज होत आहे. ‘सूर्याशक्ती प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘तुझा झालो गं’ या गाण्यातून मैत्री व प्रेमाचा रोमांचक असा प्रवास उलगडताना पाहायला मिळत आहे. तर या गाण्यातून अभिनेता सूर्या तोरसे आणि अभिनेत्री अश्विनी चवरे ही कलाकार जोडी साऱ्यांच्या मनाचा ठाव घेणार आहे. तर या रोमँटिक सॉंगला गायिका सोनाली सोनावणे आणि गायक रवींद्र खोमणे यांनी सुरबद्ध केलं आहे.

‘तुझा झालो गं’ या गाण्याची निर्मिती निर्माते संतोष पवार व रुतु कदम यांनी केली असून या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा नॉडी रसाळ याने उत्तमरीत्या पेलवली आहे. गाण्याचे बोल दिप्तेश कासारे याने शब्दबद्ध केले असून संगीताची संपूर्ण जबाबदारी दिप्तेश कासारे आणि सुनील म्हात्रे यांनी सांभाळली आहे. आशयघन कथा असलेलं हे प्रेमगीत साऱ्यांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अवघ्या काही दिवसांतच गाण्याला हजारो व्ह्यूज चाहत्यांनी दिले आहेत.

‘पुष्पा २’च्या समोर ‘बेबी जॉन’ टिकू शकेल का? ॲटलीने दिलं ठोस उत्तर

Web Title: Tuza zalo ga marathi romantic song released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 01:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.