'पुष्पा २'च्या समोर 'बेबी जॉन' टिकू शकेल का? ॲटलीने दिलं ठोस उत्तर
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’मुळे चर्चेत आहे. येत्या २५ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवनसोबत टॉलिवूडची क्वीन कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळत आहे. ५ डिसेंबरला अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाची क्रेझ कायम असताना त्या दरम्यानच वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ही रिलीज होणार आहे. दरम्यान, ‘बेबी जॉन’चे निर्माते ॲटली कुमारने ‘पुष्पा २’चा ‘बेबी जॉन’च्या कमाईवर परिणाम होईल का ? या प्रश्नावर भाष्य केलं आहे.
मैत्री की दुश्मनी? करण विवियन यांच्यात नातं कोणतं?
ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच, २५ डिसेंबरला वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. सुट्टीचा नक्कीच चित्रपटाला फायदा होणार आहे. मात्र या चित्रपटासोबतच आणखी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ही आधीपासूनच असणार आहे. अशा परिस्थितीत कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम ठेवेल किंवा कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर जिंकेल ? या प्रश्नावर निर्माते ॲटली कुमारने भाष्य केलेय. ‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान निर्माते ॲटली कुमार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केले.
बिबेक पंगेनीची कॅन्सरशी झुंज अपयशी; इन्फ्लूएंसरच्या निधनाने सोशल मीडियावर शोककळा!
‘पुष्पा २’ला मिळत असलेला प्रतिसाद ‘बेबी जॉन’ च्या कमाईचा आकडा कमी करेल का ? या प्रश्नाचं उत्तर देताना ॲटलीने सांगितलं की, “हे एक इकोसिस्टम आहे. मी आणि अल्लू अर्जुन आम्ही खूप चांगले मित्र आहोत. डिसेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात आम्ही ‘बेबी जॉन’ चित्रपट घेऊन येत आहोत, याला आपण क्लॅश म्हणू शकत नाहीत. दोन्ही चित्रपटांमध्ये कोणताही संघर्ष नाही. आम्हाला माहित होतं की, ‘पुष्पा २’ ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार, पण नंतर काही कारणास्तव चित्रपटाची रिलीज डेट डिसेंबरमध्ये शिफ्ट करण्यात आली. आमचा चित्रपट २० डिसेंबरला रिलीज होणार होता, पण आम्ही तो २५ डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसला हलवला.”
या आठवड्यात होणार डबल एव्हिक्शन? दिग्विजयनंतर या सदस्यावर टांगती तलवार
“गोष्टी कशा हाताळल्या पाहिजेत हे आपल्या सर्वांना व्यावसायिकरित्या माहित आहे. ॲटलीने सांगितले की अल्लू अर्जुनसोबत त्याची चांगली मैत्री आहे आणि त्यांच्यामध्ये असे काहीही नाही ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकेल. ख्रिसमसला प्रदर्शित होणाऱ्या बेबी जॉन या चित्रपटाचे दिग्दर्शन कालिसने केले आहे. ॲटलीने चित्रपटाचे कथानक लिहिले असून तेच त्याची निर्मिती तोच स्वत: करत आहे. वरुण धवन, कीर्ती सुरेश, सान्या मल्होत्रा आणि जॅकी श्रॉफ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि सलमान खानचा कॅमिओ असणार आहे. IMDb नुसार , बेबी जॉन चित्रपटाचे बजेट 85 कोटी रुपये आहे.
स्टेजवर एकत्र दिसले आराध्या-अबराम, बच्चन आणि खान कुटूंबाने दिले प्रोत्साहन!
‘पुष्पा २’ हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घालत आहे. Sacnilk च्या मते, ‘पुष्पा २’ या चित्रपटाने १४ दिवसांत १३९३.०७ कोटी रुपयांचे जगभरात कलेक्शन केले आहे. एकट्या भारतात चित्रपटाने ११६०.०७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई अजूनही सुरूच आहे आणि दररोज कलेक्शनचा नवा विक्रम होताना पाहायला मिळत आहे.