मिस्टर परफेक्शनीस्ट अभिनेता आमिर (Amir Khan) खानच्या आगामी लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) चित्रपटाची अनेक दिवसांपासुन सोशल मिडीयावर चर्चा सुरुये. अखेर त्याचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. या सिनेमात आमिर खानंन एका पंजाबी सरदाराची भुमिका साकारली असून त्याच्यासोबत अभिनेत्री करिना कपूरही झाला आहे. या सिनेमात आमिर खान एका पंजाबी सरदारच्या भूमिकेत दिसत आहे. आमिरसोबत करीना कपूरदेखील (Kareena Kapoor) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल टी-20 च्या अंतिम सामन्यात या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमादरम्यान सिनेमातील आमिर खानसह चित्रपटातील अनेक कलाकार स्टेडियममध्ये उपस्थित होते. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
या चित्रपटात लाल सिंह चड्ढा नावाच्या व्यक्तीचा जीवनप्रवास दाखवला आहे. तसेच आमिरने अनेक भूमिकाही साकारल्याचे ट्रेलरवरून दिसत आहे. ट्रेलरच्या शेवटी आमिर पळताना दिसतो आहे. आमिर का पळतोय हे प्रेक्षकांना सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेल.
अभिनेता आमिर खानच्या आतापर्यंतच्या सिनेमामधील त्याचा हा सिनेमात सर्वात महत्त्वाचा आणि वेगळा असल्याचं त्याने मुलाखतीत म्हटलं होतं. 11 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. एका सर्वसामान्य मुलाची असामान्य कथा सिनेमात मांडण्यात आली आहे. 2 मिनिटे 45 सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात ही आमिर खानच्या ट्रेनमधील प्रवासाने होते. लाल सिंह यांच्या लहानपणापासूनचा संपूर्ण प्रवास सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. ‘माँ कहती हैं जिंदगी गोल गप्पे जैसी होती हैं’, या आमिर खानच्या डायलॉगने सर्वांची मनं जिंकली आहेत. लहानपणी दिव्यांग असलेला लाल सिंह चड्ढा त्याच्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने स्वत:च्या पायावर उभा राहतो. धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊन शर्यतही जिंकतो. त्यानंतर तो सैन्यात भर्ती होण्याचा निर्णय घेतो, हे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.