
अनेक दिवसापासून मोठ्य पडद्यावरुन गायब झालेली रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर ( Urmila Matodkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तिवारी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून उर्मिला ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. नुकतच तिच्या वेबसिरिज पोस्टर आऊट झालं असून फॅन्स तिला पाहण्यास उत्सुक असल्याच दिसत आहे.
[read_also content=”ब्रह्मास्त्र’च्या कमाईचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड, अयान मुखर्जीने मानले प्रेक्षकांचे आभार https://www.navarashtra.com/movies/brahmastra-became-number-one-worldwide-movie-of-2022-nrsr-332598.html”]
आतापर्यंक अनेक दर्जेदार चित्रपटातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या अभिनय दिसला आहे.
‘सत्या’, ‘एक हसीना थी’, ‘भूत’, ‘रंगीला’ या चित्रपटात तिच्या भुमिका अतिशय गाजल्या. आत ती ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ‘तिवारी’ अॅक्शनचा तडका असलेल्या वेबसीरिजमध्ये उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिका साकारत आहे. आई-मुलीच्या गोड नात्यावर आधारीत ही वेबसीरिज आहे. सौरभ वर्मा या वेबसीरिजच्या दिग्दर्शन करत आहे.