vadh
संजय मिश्रा (Sanjay Mishra) अभिनित ‘वध’ (Vadh) या चित्रपटाची टीझर पोस्टरसह घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर संजय मिश्राला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच, निर्मात्यांनी या चित्रपटाचे आणखी एक टीझर पोस्टर (Vadh Teaser Poster) प्रदर्शित केलं आहे, ज्यामध्ये संजय मिश्रा एका अनोख्या रुपात दिसत आहेत.
Every Story Has A Reason. Know The Reason Of #Vadh only in cinemas on 9 Dec.@imsanjaimishra @Neenagupta001 #SaurabhSachdeva @manavvij786 @J_Studio_ #RajeevBarnwal @luv_ranjan @gargankur @NeerajRuhil21 @subhav86sharma #NympheaSarafSandhu pic.twitter.com/ZubXCPbkHk
— Luv Films (@LuvFilms) November 18, 2022
या नवीन पोस्टरमध्ये, संजय मिश्रांच्या चेहऱ्यावर वेगळे भाव असून, मनोहर कहानियां हे मासिक त्यांच्या हातात दिसत आहे. या टीझर पोस्टरद्वारे निर्माते काय इशारा देण्याचा प्रयत्न करत आहेत याविषयी आता सस्पेन्स निर्माण झाला आहे. तसेच, थ्रिलर ड्रामाच्या शैलीत संजय मिश्रा यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकांची उकंठा वाढत आहे.
[read_also content=”रवी जाधव दिग्दर्शित चित्रपटात अटलजींच्या भूमिकेत दिसणार पंकज त्रिपाठी https://www.navarashtra.com/entertainment/actor-pankaj-tripathi-to-play-atal-bihari-vajpayee-in-ravi-jadhavs-movie-nrsr-346071/”]
संजय मिश्रा आणि नीना गुप्ता या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाने सजलेला ‘वध’ हा निश्चितच एक विशेष चित्रपट असेल असे दिसते. ‘वध’हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.