फोटो सौजन्य - Social Media
दिवसेंदिवस अभिनेता सनी देओलच्या आगामी चित्रपट बॉर्डर २ विषयी नवनवीन बातम्या समोर येत आहे. नुकतेच चित्रपटाबद्दल एक बातमी समोर आलो होती कि बॉर्डर २ मध्ये अभिनेता सनी देओल सोबत अभिनेता आयुष्यमान खुराणाही दिसून येणार आहे. यादरम्यान, प्रेक्षकांना तसेच सनी देओल यांच्या चाहत्यानां चित्रपटातील अभिनेत्री कोण असणार? असा प्रश्न पडला होता. परंतु, त्याचे उत्तर अद्याप आले नाही आहे. बॉर्डर २ या सिनेमाच्या मुख्य पात्र निभवणाऱ्या ऐक्ट्रेसविषयी अजून कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. महत्वाची बाब म्हणजे, बॉर्डर २ या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा आणखीन एक सुप्रसिद्ध अभिनेता पुनः एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
सनी देओल यांचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ जवळपास दीड वर्षांनी जानेवारी २०२६ च्या २३ तारखेला सर्वत्र प्रदर्शित केले जाणार असे जाहीर केले आहे. यादरम्यान आयुष्यमान खुराणाची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे. तसेच बी टाऊनच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने चित्रपटाला साइन केले आहे. ‘स्त्री २’ तसेच ‘मुंज्या’ मध्ये वरून धवनचा कॅमिओ चांगलाच हिट झाला. यानंतर बॉर्डर २ चित्रपटात वरून धवनही झळकणार असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. महत्वाचं म्हणजे वरून धवनने बॉर्डर २ सिनेमाला साइन केले आहे. परंतु, वरून धवन नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार आहे? याबद्दल कोणतीच बातमी अद्याप समोर आलेली नाही. त्याचबरोबर सिनेमाच्या अभिनेत्रीबद्दल कोणतीच सुनावणी अद्याप करण्यात आलेली नाही.
हे सुद्धा वाचा : उतारवयात तरुणांना लाजवणारी ऊर्जा; बिग बी पैशाची कमी नसताना ही करतात काम
१५ ऑगस्ट रोजी श्रद्धा कपूर तसेच राजकुमार राव स्टारर सिनेमा स्त्री २ सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे सिनेमाने एडव्हान्स बुकिंगमध्येच पाहिल्या दिवसाची कमाई छापली होती. या सिनेम्यात अभिनेता वरून धवन दिसून आला होता तसेच जून २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा मुंज्या मध्ये देखील वरून धवनचा कॅमिओ दिसून आला होता. वरून धवनचा बॉर्डर २ मधील अभिनय पाहण्यास त्याचे चाहते उत्सुक असल्याचे चित्र दिसून येत आहे.