फोटो सौजन्य - Social Media
नुकतंच काही महिन्यांपूर्वी, बॉलीवूडचे बिग बी म्हणून जगभरात ख्याती असणारे अमिताभ बच्चन यांचा ‘कल्की: २९८९ AD’ सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कहरच केला होता. सिनेमात अमिताभ बच्चन यांनी शिवाचा अंश असलेल्या अश्वत्थामाची भूमिका निभावली होती. वय ८०च्या घरात असतानाही त्यांच्या कामातील स्फूर्ती त्यांनी त्यांच्या भूमिकेतून दाखवून दिली होती. कल्की: २९८९ AD चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यांच्या त्या भूमिकेस प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर बिग बी त्यांच्या जगभर प्रसिद्ध असणाऱ्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या सोळाव्या पर्वात होस्ट म्हणून दिसून येणार आहेत.
बी टाऊनचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. त्यांच्या व्यस्थ जीवन शैलीतून जसे त्यांना वेळ मिळते त्यात ते त्यांच्या चाहत्यांसोबत सोशल माध्यमांतून जोडले जातात. त्यांचे बहुतेक सोशल मीडियावरील संदेश हे स्वतःबद्दल असते, जे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास मार्ग उपलब्ध करते. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगद्वारे स्वतःबद्दल आणखीन एक मोठा खुलासा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे कि अनेक लोकं त्यांना नेहमी त्यांच्या कामातील स्फूर्ती आणि ऊर्जेबद्दल विचारात असतात. अनेकदा कौन बनेगा करोडपातीच्या सेटवर त्यांना विचारले जाते कि,” तुम्ही या वयातही इतकी कामे का करता?” या सगळ्या प्रश्नांचे उत्तर बिग बींनी त्यांच्या या ब्लॉगद्वारे कळवले आहे.
हे सुद्धा वाचा : तारक मेहता का उलटा चष्माला कोर्टाकडून दिलासा; असित मोदींनी मानले न्यायालयाचे आभार
अभिनेते अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगतात कि,” मला नेहमी विचारले जाते कि मी या वयातही कामं का करतो? तर याचे माझ्याकडे खरंच उत्तर नाही. यावर मी इतकेच सांगेन कि हे कामं माझ्यासाठी एक संधी असते.” बिग बी म्हणतात कि,”प्रत्येकाकडे कामं करण्याचे काही ना काही कारण असते. कुणी आपल्या आदर्श व्यक्तिमत्वाचे अनुसरण करते. आपण एकदा माझ्या जागी येऊन पाहावे, तेव्हा तुम्हाला जाणीव होईल कि मी बरोबर आहे कि चुकीचा. आपल्याला आपला उत्तर शोधण्याचे स्वातंत्र्य आहे तर मला माझे काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. या वयात मला कामं मिळतात म्हणून मी ते करतो. यात आपल्याला काही समस्या आहे का?” अशा शब्दात अमिताभ बच्चन यांनी प्रश्नांचे उत्तर दिले आहे.